बाभुळसरमध्ये विजेचा करंट लागून तरुणाचा मृत्यू

अल्लाउद्दीन अलवी/मांडवगण फराटा प्रतिनिधी 

बाभुळसर बुद्रुक, (शिरूर ) दि. ३० संजय आत्माराम नागवडे यांचे चिरंजीव जिवन नागवडे (वय३०) दुपारी पावणे दोनच्या सुमारास पाऊस येत असल्याने नदीवरील शेतीपंप बंद करण्यासाठी गेले लाईटचा झटका लागून मृत्यू झाल्याची घटना बाभुळसर बुद्रुक येथे घडली आहे

पाऊस येत असल्याने जीवन नागवडे नदीवर शेतीपंप बंद करण्यास गेले, शेती पंप बंद करून पॅनल बॉक्सला कुलूप लावत होते परंतु भोवताली जमीन ओली असल्याने त्याला विजेचा जबर झटका बसून तेथेच बेशुद्ध पडला, मुलगा घरी येईना म्हणून संजय नागवडे यांनी जीवनला फोन करण्याचा प्रयत्न केला परंतु जीवन याने फोन उचलला नसल्याने संजय नागवडे यांच्या मनात शंका आली ते नदीकडे गेले त्यांना जीवन पॅनल बॉक्सजवळ बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे आढळून आले त्यांनी त्वरीत डी पी बंद केली व जीवन यांस मांडवगण फराटा येथील वरदविनायक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले परंतु जीवनचा उपचार दरम्यान मृत झाल्याचे डॉ. मनोज भोसले यांनी घोषित केले.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें