रिंगरोड संदर्भात स्थळ पाहणीस आलेल्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी केला तीव्र विरोध 

लोणीकंद (ता.हवेली ) : येथे दि. ४ मार्च २४ रोजी पुणे रिंगरोड संदर्भात मौजे लोणीकंद तालुका हवेली येथील रिंगरोडचे मूळ व अतिरीक्त क्षेत्राची स्थळ पाहणी करण्यासाठी आलेल्या भूसंपादन अधिकारी तथा हवेलीचे उपविभागिय अधिकारी यांना जमीन बाधित लोणीकंद ग्रामस्थांनी लेखी स्वरुपात निवेदन देत स्थळ पाहणी करण्यास तीव्र स्वरूपाचा विरोध दर्शविला

 

दि. २९ मार्च २४ रोजीचे पत्राअन्वये रिंगरोडचे मूळ व अतिरीक्त क्षेत्राची स्थळ पाहणी करण्यासाठी १) उपअधिक्षक भूमि अभिलेख, हवेली, २)उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग (दक्षिण) पुणे, उपविभाग हवेली, ३) उपविभागीय जलसंधारण अधिकारी, जिल्हा परिषद (ल.पा) उपविभाग हवेली, ४) तालुका कृषि अधिकारी, हवेली, ५) वन परिक्षेत्र अधिकारी, हवेली (पुणे रेंज), ६) उपअभियंता महाराष्ट राज्य रस्ते विकास महामंडळ (मर्या), शिबीर कार्यालय, पुणे, ७) ग्रामसेवक लोणीकंद तालुका हवेली, ८) मोनार्च सर्व्हेअर्स अॅन्ड इंजिनीअरींग कन्सल्टटस प्रा. लि., ९) मंडळ अधिकारी, हवेली, १०) तलाठी, लोणीकंद हे सर्व अधिकारी येणार होते असे नोटीशीद्वारे जाहीर केले होते परंतु प्रत्यक्षात उपअधिक्षक, भूमि अभिलेख हवेली शाखा अभियंता बांधकाम विभाग तसेच तलाठी प्रतिनिधी हे तीनच अधिकारी स्थळ पाहणीस जागेवर आले असता इतर विभागाचे अधिकारी उपस्थित नसल्यामुळे गावकऱ्यांनी त्यांना स्थळ पाहणी करण्यास विरोध केला तसेच पुणे चक्राकार मार्ग तथा विकास कामाबाबत आमची हरकत नाही परंतु पूर्वी गावठाणातील चारपदरी रस्त्यासाठी जागा संपादन केल्या त्याचा मोबदला मिळाला नाही असे अनेक प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केले या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत तोपर्यंत स्थळ पाहणी करू नये असे लेखी स्वरूपात निवेदन दिले आहे.

पुणे रिंगरोड संदर्भात सदरील कार्यालया मार्फत भूसंपादन प्रक्रिया जलद गतीने प्रगतीत आहे या मार्गामध्ये हवेली तालुक्यातील मौजे लोणीकंद या गावाचे क्षेत्र बाधीत होत आहे, गावठाणातील स्वयंभू ऐतिहासिक असे अनेक वर्षांपूर्वीचे लोणीकंद ग्रामस्थांचे ग्रामदैवत म्हसोबा मंदिर तसेच संत सावतामाळी मंदिर ही दोन मंदिरे महामार्गासाठी संपादन करू नये, जबरदस्तीने मंदिरे हटवून जागा संपादित केल्यास ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. उपसभापती रवींद्र कंद यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले .

 

 

 

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें