पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासना कडून मनाई आदेश जारी

 

 

प्रतिनिधी हवेली

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (२) (३) प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश सदरचा आदेश मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर यांचे मान्यतेने आयुक्त विशेष शाखा (संभाजी कदम) पोलीस उप-आयुक्त,विशेष शाखा, पुणे शहर दिनांक २२/१२/२०२३ रोजी दिला आहे.

पुणे शहरात जनतेच्या विविध मागण्यांसाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना मोर्चे, धरणे, निदर्शने, बंद व उपोषणा सारखे आंदोलनाचे आयोजन करतात विविध कारणांमुळे तसेच अतिक्रमण हटवण्याच्या कारवायांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते त्यामुळे पुणे शहरात पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दिनांक २६/१२/२०२३ रोजी ००.०१ वा. पासून ते दिनांक ०८/०१/२०२४ रोजी २४.०० वा पर्यंत १४ दिवसांसाठी खालील नमूद केलेली कृत्ये करण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात आली आहे.

 

अ) कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, ज्वलनशील द्रव पदार्थ बरोबर नेणे. ब) दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे, सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे. क) शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठया, बंदुका व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे. ड) कोणत्याही इसमाचे चित्राचे प्रतिकात्मक प्रेताचे, पुढा-यांच्या चित्राचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे. इ) मोठयाने अर्वाच्च घोषणा देणे, सार्वजनीक टिकाकरण उच्चार गाणी गाणे, वाद्य वाजविणे. फ) पुणे शहरात तैनात असलेल्या कोणत्याही पोलीस अधिका-याच्या मते, शालीनता किंवा शिष्टाचाराच्या विरोधात असणारे चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणतीही वस्तु किंवा वस्तु तयार करणे, प्रदर्शन करणे किंवा प्रसारीत करणे जेणे करुन सार्वजनिक नैतिकता किंवा सुरक्षा धोक्यात येईल किंवा राज्य उलथुन टाकणेस कारणीभुत ठरु शकेल. ग) यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे किंवा आविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करून त्याचा जनतेत प्रसार करणे या कृत्यावर बंदी घालीत आहे. पुणे शहर परिसरात कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल अशा पद्धतीने महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ च्या कलम ३७(१) (२) (३) विरूध्द वर्तन करणे. घ)४/- महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ च्या कलम ३७ चे पोटकलम (३) पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचे पुर्व परवानगी शिवाय सभा घेणेस किंवा मिरवणुक काढणेस बंदी घालीत आहे. ५/- वरील संपूर्ण आदेश हा शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपुर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही. हा आदेश खाजगी सुरक्षा रक्षक किंवा गुरखा किंवा चौकीदार इत्यादींना लागू होणार नाही, जे ३ १/२ फूट पर्यंत लांबी पर्यंतच्या लाठया बाळगत आहेत. ६/- सदरचे आदेशाला जाहिररित्या ठळक प्रसिध्दी दयावी ७/- वर नमुद केलेल्या कालावधीनंतर या आदेशाची मुदत संपली तरीही अ) कोणताही तपास किंवा कायदेशीर कार्यवाही सुरु केली जावु शकते, चालु ठेवली जावु शकते किंवा लागु केली जावु शकते. ब) या आदेशाचा कोणताही उल्लंघनाच्या संदर्भीत झालेल्या कोणत्याही दंड, जप्ती किंवा शिक्षा लागु केल्या जावु शकतात जणु हा आदेश कालाबाहय झाला नाही. ८/- या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधीत व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ चे कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र होईल असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे .

 

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें