बाभुळसर बुद्रुक तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे बिबट्याचा वावर

 

अलाउद्दीन अलवी बाभुळसर बु प्रतिनिधी ता २२ बाभुळसर बुद्रुक तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे काल दि. २१/१२/२०२३ रोजी सायंकाळी चार वाजता दोन बिबट्याचा वावर गणेशवाडी येथील शरद बाबुराव नागवडे यांच्या नदीवरील लिफ्टाजवळ आढळून आला.

यावेळी नदीच्या काठावर शेळया चरत असताना बिबट्याने संजय विठ्ठल नागवडे यांच्या शेळीची शिकार केली. नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी याबाबत लक्ष घालून पंचनामा करून तातडीने पिंजरा लावण्याची व्यवस्था करावी असे यावेळी सरपंच दिपालीताई नागवडे यांनी सांगितले. तसेच मांडवगण फराटा,सिरसगाव काटा, इनामगाव, तांदळी, गणेगाव दुमाला, बाभुळसर बुद्रुक या ठिकाणी बिबट्याच्या वावर वाढल्याने सध्या कांदा लागवड चालू असल्याने महिला वर्गामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें