पुणे शहर गुन्हे शाखा युनिट ६ कडून दरोडेखोर हंसराज रणजितसिंग टाक जेरबंद

 

प्रतिनिधी लोणीकंद

हडपसर : महाराष्ट्रातील वेगवेगळया जिल्हयात दरोडा व घरफोडया करणाऱ्या हंसराज रणजितसिंग टाक (वय १८ वर्षे ) रा. तुळजाभवानी वसाहत गाडीतळ, हडपसर, पुणे या आरोपीस दिनांक १३/१२/२०२३ रोजी गुन्हे शाखा युनिट-६ ने ताब्यात घेतले असून त्याच्या कडून तब्बल ९ गुन्हे उघड झाले आहे .

पुणे शहरातील जबरी चोरी, घरफोडी व वाहनचोरी या गुन्हयांना आळा बसावा या करीता तीव्र मोहिम राबवून कारवाई करणेबाबत वरिष्ठ अधिकारी यांनी आदेशित केले होते. हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं. १८४२/२०२३ भा.दं. वि. कलम ४५४, ४५७, ३८० या गुन्हयाचा तपास युनिट-६, मार्फत चालू असताना पो.ना. ७३१७ नितिन मुंढे यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्हा हंसराज रणजितसिंग टाक याने केलेला असून तो कॅनॉल रोड, हडपसर, पुणे येथे येणार आहे. अशी खात्रीशिर माहिती मिळाल्याने मा.रजनीश निर्मल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट-६, पुणे शहर यांचे आदेशानुसार युनिट कडील अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचून मोठ्या शिफारीशीने हंजराज ऊर्फ हंसु रणजितसिंग टाक यास जेरबंद केले .

पोलीसांनी आरोपीस विश्वासात घेऊन दाखल असलेल्या गुन्हयाचे अनुषंगाने प्राथमिक तपासात सदरचा गुन्हा त्याने केल्याची कबुली दिल्याने त्यास दि. १३/१२/२०२३ रोजी अटक करुन त्याची पोलीस कस्टडीची रिमांड घेऊन  तपासादरम्यान त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले तसेच त्याने मुद्देमाल काढून देत असले बाबत निवेदन केल्याने त्याचे निवेदना प्रमाणे पोलीसांनी तेथे जाऊन आरोपीने सोन्याचे दागिनेंची तसेच रोख रक्कमेची घरफोडी चोरी केल्याची ठिकाणे दाखवून एकुण ०६,१०,५००/- रु.किं. चे १११ ग्रॅम सोन्याचे दागिने असा मुद्देमाल काढून दिल्याने तो मेमोरंडम पंचनाम्याने जप्त करण्यात आला आहे त्यामध्ये खालील पो.स्टे कडील एकुण ९ गुन्हे उघडकीस आले आहेत. १) हडपसर पोस्टे १८४२ / २०२३ भादवि ३८०,४५४,४५७, २) लोणी काळभोर पो.स्टे ५९९/२३ भादंवि ४५४ ३८०, ३) लोणी काळभोर पो.स्टे ७३१ / २०२३ भादवि ४५४, ४५७,३८०, ४) कोंढवा पो.स्टे १२५७/२०२३ भादवि ४५७,३८०,५) कोंढवा पो.स्टे गु.र.नं. १२०५/२०२३ भादवि ४५४,३८०,६) लोणीकंद पो.स्टे ४५९/२०२३ भादवि ४५४ ३८०,७) लोणीकंद पो.स्टे ६५१/२०२३ भादंवि ४५४ ३८० आरोपीकडे तपास करता तो महाराष्ट्रातील खालील पो. स्टे चे गुन्हयातील पाहिजे आरोपी असल्याचे उघडकीस आले आहे.१) कोतवाली पो.स्टे अहमदनगर गु.र.नं. ११७९/२०२३ भा.द.वि.क. ३९५, ३८०, ४५७, २) एम.आय.डी.सी. पो.स्टे. सोलापुर शहर गु.र.नं. ७३० / २०२३ भा.द.वि.क.३९५,३९२,३४ आर्म अॅक्ट ३,४ (२५) ३) एम.आय.डी.सी. पो.स्टे. सोलापुर शहर गु.र.नं. ७२२ / २०२३ भा.द.वि.क.३८०,४५७, ४) एम.आय.डी.सी. पो.स्टे. सोलापुर शहर गु.र.नं. ७२९ / २०२३ भा.द.वि.३५३, ५) एम.आय.डी.सी. पो.स्टे. सोलापुर शहर गु.र.नं. ७३२ / २०२३ भा.द.वि.क.३७९, ६) जेलरोड पो.स्टे. सोलापुर शहर गु.र. नं. ३८७ / २०२३ भा.द.वि.क.३७९, ७) जेलरोड पो.स्टे. सोलापुर शहर गु.र. नं. ३८९/२०२३भा.द.वि.क.३७९, ८) फौजदारी चावडी पो.स्टे सोलापुर शहर गु.र.नं. ६०५/२०२३ भा.द.वि.क.३७९, ९) वळसंग पो.स्टे. सोलापुर ग्रामीण गु.र. नं. ४३९ / २०२३ भा.द.वि.क ४५७,३८०, १०) हडपसर पो.स्टे गु.र.नं. १३४५/२०२३ भा.द.वि.क. ३९५,३९७, ५०४,५०६ आर्म ऍक्ट ३ (२५), नमूद गुन्हयाचा तपास मा. रजनीश निर्मल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट-६, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली भैरवनाथ शेळके, पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा युनिट-६, पुणे शहर हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही मा. श्री. रितेशकुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. श्री. रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, मा. श्री.अमोल झेंडे, पोलीस उपआयुक्त, गुन्हे, मा. श्री. सतिश गोवेकर, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे -२, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट-६ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रजनीश निर्मल,पोलीस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, सुरेश जायभाय, अंमलदार विठ्ठल खेडकर, नितीन मुंडे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, प्रतिक लाहीगुडे, कानि नाथ कारखेले, ऋषिकेश व्यवहारे, ऋषीकेश कवणे, सचिन पवार, नितीन धाडगे, महेंद्र कडु, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

10:22