भगवानराव किसनराव शेळके यांनी मराठा आरक्षण आंदोलनास पाठींबा देण्यासाठी आपल्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला

 

प्रतिनिधी लोणीकंद

पिंपळे जगताप (ता शिरूर ) दि १ मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणारे जरांगे पाटील यांना जाहिर पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज्याच्या वतीने पिंपळे जगताप (चौफुला ) समस्त ग्रामस्थांनी साखळी उपोषण सुरु केले असुन पुणे जिल्ह्याचे  भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस भगवानराव किसनराव शेळके यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला

 

भारतीय जनता पार्टीचे महाराष्टू राज्य प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे राजीनामा पाठविला असून आपल्या पक्षांमध्ये विविध पदांवर कार्य करत असुन सर्व पदांचा व प्राथमिक सदस्य पदांचा राजीनामा देत आहे. पक्षाच्या सर्व पदांपासुन मी स्वतःला मुक्त करत आहे. सदर राजीनामा हा मी सकल मराठा समाजाला सरकार आरक्षण देत नसल्यामुळे व जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी उपोषण करत आहे. त्यांना पाठींबा देण्यासाठी देत आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण नाही, तो पर्यंत पद नाही पक्ष नाही आता फक्त एकच मिशन मराठा आरक्षण असे माध्यमांशी बोलताना भगवान शेळके यांनी सांगितले यावेळी गावातील तरूण वर्ग, ज्येष्ठ नागरिक बहुसंख्य ग्रामस्थ बंधू-भगिनी साखळी उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी मोठया संख्येने सहभागी झाले होते

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें