निर्वी येथील सकल मराठा समाजाला साखळी उपोषणासाठी सरपंच दिपाली नागवडे यांचा पाठिंबा.    

प्रतिनिधी : बाभुळसर

निर्वी (ता शिरूर ) : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी निर्वी येथील सकल मराठा बांधव साखळी उपोषण सुरु असून त्यांना सरपंच सौ.दिपाली महेंद्र नागवडे यांनी पाठिंबा दिला.त्यावेळी निर्वि ग्रामस्थांनी दिपाली नागवडे यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने जाहीर सत्कार केला.

 

यावेळी दिपाली नागवडे म्हणाल्या मी पदाचा राजीनामा दिला असून तो ग्रामसेकांनी तो बिडिओ साहेबाकडे मंजुरीसाठी पाठविण्यास सांगितलं आहे.तरी प्रत्येक घटकातील व्यक्तीने आपापल्या परीने शासनावर दबाव तंत्र वापरून उपोषण करून, शांततेत आंदोलन करावे असे आवाहन यावेळी केले.यावेळी जयश्रीताई पलांडे म्हणाल्या पुढारी गावबंधी असल्या कारणाने मी स्वतः त्याचे पालन करीत आहे,पण मी स्वतः मराठा आसल्या कारणाने मला माझ्या बंधावसाठी येथपर्यंत यावे लागले. १ टक्के कमी असल्या मुळे माझ्या मुलीचे खूप नुकसान झाले आहे.आरक्षण त्यावेळी असते तर तिचे नुकसान झाले नसते, म्हणून आरक्षण खूप गरजेचे आहे.म्हणून मी जाहीर पाठींबा देत आहे. यावेळी निर्वीच्या सकल मराठा समाज बांधावा मार्फत निरवी, शिरसगाव, इनामगाव, तांदली, गणेगाव, बाभुळसर, मांडवगण, सादलगावं, वडगाव, कुरुळी बाईक रॅली काढून आरक्षणा विषयी जनजागृती करण्यात आली.यावेळी निर्वीचे मा.सरपंच तात्यासाहेब सोनवणे, सदस्या प्रियंका माळवदकर, मा.आदर्श सरपंच सुनीता सोनवणे, अनिल वाबळे, सुनील सोनवणे मेजर, उल्हास सोनवणे, निलेश सोनवणे उपसरपंच, महेंद्र नागवडे, अमित नागवडे, शाम दादा शेलार, मोहन कुल,अनिकेत सोनवणे, दत्ता जगताप, नंदकुमार सोनवणे, भाऊसो सोनवणे, संजय सोनवणे, रामदास सोनवणे, सुनील काटे, श्रीधर महामुनी, शफीक पठाण, शकील भाई,राहुल खराडे, संतोष सोनवणे, राजेंद्र सोनवणे, बालाजी सोनवणे, संपत आबा सोनवणे, अमोल सोनवणे, अजित लटंबळे, शरद पवार, सुनील सोनवणे, जनार्दन सोनवणे, चिन्मय थोरात आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें