l
प्रतिनिधी : अल्लाउद्दीन अलवी
बाभुळसर बु ता २६ . मांडवगण फराटा ता शिरूर जि पुणे येथे सकल मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी माजी सैनिक व माजी सरपंच शिवाजी कदम, अंकुश जगताप आणि सूरज मोहन चकोर यांनी अमरण उपोषणाला बाभुळसर बु गावचे सरपंच दिपाली नागवडे यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला
त्यावेळी मा.पंचायत सदस्य लक्ष्मण बापू फराटे,छत्रपती विका सहकारी संस्था चेअरमन मनोज फराटे, मांडवागण तंटामुक्ती अध्यक्ष हनुमंत फराटे, शिवसेना उपतालुका प्रमुख संदीप जगदाळे, प्रताप पाटील फराटे,योगेश फराटे पाटील,ऋषी सकुंडे,मराठा बांधवानी दिपाली महेंद्र नागवडे यांनी आपल्या समाजासाठी सरपंच पदाचा राजीनामा दिला त्याबद्दल जाहीर सत्कार केला.
यावेळी त्यांच्या समवेत बाभुळसर विका सेवा सोसायटी मा.व्हा.चेअरमन भाऊसो थोरात,संत तुकाराम सोसायटी संचालक रामदास नेते नागवडे,ग्रामपंचायत सदस्या प्रीती नागवडे,महेंद्र नागवडे मा उपाध्यक्ष जि. प.शाळा व्यवस्थापन समिती,प्रशांत नागवडे सुहानी दूध संस्था चेअरमन,अमित बाळासो नागवडे,अभिजित फराटे, गोरक्ष शितोळे मा.ग्रामपंचायत सदस्य,नंदकुमार पवार,आदी उपस्थित होते.
यावेळी सरपंच दिपाली नागवडे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मी माझ्या पदाचा राजीनामा दिला असून समाजासाठी प्रत्येक घटकातील व्यक्तीने पुढे येऊन,प्रसंगी आपल्या पदाचा त्याग करून शासानावरती दबाव तंत्र वापरून आपल्या हक्काचे आरक्षण मिळण्यासाठी योगदान दिले पाहिजे कारण आता नाही तर कधीच आरक्षण मिळणार नाही असे त्यांनी नमूद केले.