प्रतिनिधी:अल्लाउद्दीन अलवी बाभुळसर बु
ता. २८ बाभुळसर बुद्रुक तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील संत तुकाराम सहकारी सोसायटीच्या कार्यालयामध्ये गौरी शुगर ऍड डिस्सलरी प्रा. लि. हिरडगाव (युनिट ४)ता श्रीगोंदा जि अहमदनगरचे चेअरमन मा बाबुरावजी बोत्रे पाटील साहेब यांचा गाव भेट दौरा बाभुळसर बु येथे आले असता त्यांचा संस्थेच्या भव्य दिव्य कार्यालयात यथोचित सन्मान संस्थेचे मा चेअरमन हनुमंत भाऊ पाटोळे यांचे हस्ते बाभुळसर बु गावच्यावतीने करण्यात आला.
यावेळी प्रमुख उपस्थितीत खालील मान्यवर उपस्थित होते.मा रोहिदास यादव साहेब जनरल मॅनेजर ,साठे साहेब शेतकरी अधिकारी, लक्ष्मण बापू फराटे मा.सदस्य पंचायत समिती शिरूर ,हनुमंत भाऊ पाटोळे संचालक परिक्रमा, सकाळचे पत्रकार भोयटे सर, दिनेश दरेकर प्रगतशील शेतकरी,संत तुकाराम वि का संस्थेचे चेअरमन सुनील तुकाराम नागवडे,अंकुश आबा नागवडे अध्यक्ष पद्मश्री आप्पासाहेब पवार माध्यमिक विद्यालय,राजेंद्र नागवडे मा उपसरपंच, किशोर नागवडे चेअरमन श्रीराम वि का, जेष्ठ रामभाऊ नागवडे,मा चेअरमन विजय नागवडे, भाऊसाहेब थोरात, दत्तात्रय नागवडे,सगाजी नागवडे,रामदास नेते संचालक मनोज मचाले, संतोष शिवाजी नागवडे मा चेअरमन,शरद नागवडे,महेंद्र रणदिवे,मा चेअरमन मारुती नागवडे,सचिन नागवडे संचालक बाभुळसर बु वि का,संतोष प्रगतशील शेतकरी,जालींदर नागवडे,अजित गवळी, संतोष नागवडे, हनुमंत नागवडे, जयसिंग मचाले,प्रदीप गवळी, शरद गमाजी, हरिदास नागवडे, प्रकाश रणदिवे,अनिकेत शितोळे,काका टेकवडे, नवनाथ नागवडे,डॉ दादा भगत, गोपीचंद नागवडे, जालिंदर रणदिवे, आदी उपस्थित होते.
यावेळी अंकुश आबा नागवडे यांनी ऊस उत्पादक शेतकरी यांनी ऊसाला उच्चांकी बाजारभाव मिळावा अशी मागणी केली. तसेच गौरी शुगर ऍड डिस्सलरी प्रा. लि. हिरडगाव चे जनरल मॅनेजर कारखाना सुरू करणेसाठी मेंटेनन्स बाबत माहिती दिली. तसेच कारखान्याचे चेअरमन मा बाबुरावजी बोत्रे पाटील यांनी शेतकरी बैठकीमध्ये सांगितले की प्रथम शेतकर्यांचे पेमेंट मस्टर भरल्यानंतर लगेच खात्यावर जमा केले जाईल तसेच अहमदनगर जिल्ह्यात उच्चांकी पेमेंट दिले जाईल आणि कामगार पगार, माल पुरवठा पेमेंट व बॅंक कर्जवसुली ताबडतोब दिले जाईल असे यावेळी सांगितले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अल्लाउद्दीन अलवी यांनी केले व सर्व उपस्थितांचे आभार मा उपसरपंच राजेंद्र नागवडे यांनी मानले.