अपशब्द वापरणाऱ्या गुणवंत सदावर्तेवर सरकारने कारवाई करावी,अन्यथा आम्ही त्याचा बंदोबस्त करू : संभाजी ब्रिगेड 

 

पुणे : मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे सराटी मध्ये सुरु असलेल्या आमरण उपोषणाला समर्थन देण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण चालू असून त्या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी भेट दिली मनोज जरांगे पाटील यांच्या विषयी अपशब्द वापरणाऱ्या गुणवंत सदावर्तेवर सरकारने कारवाई करावी,अन्यथा आम्ही त्याचा बंदोबस्त करू असा इशारा चंद्रशेखर घाडगे यांनी यावेळी दिला आहे .

 

यावेळी महानगरध्यक्ष अविनाश मोहिते,जिल्हाध्यक्ष उत्तम कामठे, जिल्हा सचिव निलेश ढगे,हवेली तालुकाध्यक्ष शिवाजी पवार, सरचिटणीस सनी थोपटे, शहर कार्याध्यक्ष अविनाश घोडके, दिनकर केदारी,आदम तांबोळी, यांच्यासह इतर पदाधिकारी व मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

 

मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत पुणे जिल्ह्यात शहरात प्रामुख्याने शिरूर लोकसभा मतदारसंघात एकाही राजकीय नेत्याने,आमदार, खासदार,मंत्र्याने कार्यक्रम घेऊ नये,कार्यक्रम घेतल्यास तो कार्यक्रम उधळून लावण्यात येईल तसेच पुणे-नगर रोड परिसरात आमदार, खासदार, मंत्री यांची गाडी दिसल्यास ती गाडी अडवण्यात येईल व मराठा समाजाच्या वतीने लोकप्रतिनिधींना घेराव घातला जाईल,असा इशारा चंद्रशेखर घाडगे यांनी माध्यमांशी बोलताना दिला . मराठा बांधवांनो तुमची तुमच्या कुटुंबाला व समाजाला गरज आहे, कोणीही आत्महत्या करू नये असे आवाहन संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें