प्रतिनिधी लोणीकंद
वाजेवाडी (ता . शिरूर) वाजेवाडी-मांजरेवाडी ग्रामपंचायत पंचवार्षिक (२०२३-२०२८ ) ग्रामपंचायतसाठी होत असलेल्या उमेदवारांनी भरलेले अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी (दि. २५) सरपंचपदासाठीचे पाच अर्ज मागे घेण्यात आले. यानंतर आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून सरपंचपदासाठी दोन तर सदस्यपदासाठी आठ उमेदवार रिंगणात आहेत. यामुळे निवडणूक असलेल्याने गावामध्ये आता राजकारण तापू लागले असून उमेदवारांनी आपला जनसंपर्क सुरू केल्याचे दिसत आहे.
उमेदवारांकडून भेटी-गाठी वाढल्या
थेट सरपंच पदासाठी ग्रामदैवत पद्मावती माता प्रगती पॅनल कडून उमेदवार प्राजक्ता हिम्मत वाजे ( चिन्ह : छत्री) तर पद्मावती माता ग्रामविकास पॅनलकडून उमेदवार पूनम झानेश्वर चौधरी (चिन्ह कपबशी) यांच्यात लढत होणार आहे
वार्ड क्रं १ मध्ये तीन जागे पैकी औदुंबर शिवाजी भोंडवे व सुरज मधुकर तिखे हे दोन उमेदवार बिनविरोध झाले असून ग्रामदैवत पद्मावती माता प्रगती पॅनल मधून पल्लवी रामदास शेळके (चिन्ह फॅन) तर पद्मावती माता ग्रामविकास पॅनल मधून चैताली राहूल वाजे चिन्ह (रोड रोलर ) या एका जागेसाठी दोन उमेदवार रिंगणात उतरले आहेत
वार्ड क २ मध्ये रामदास काका मांजरे, श्वेता भानुदास मांजरे , सुरेखा रमेश मांजरे या तीनही जागेचे उमेदवार बिनविरोध झाले तर
वॉर्ड क्र ३ मधून ग्रामदैवत पद्मावती माता प्रगती पॅनल मधून संदीप बाळासाहेब भोर ( चिन्ह : कपाट), मंगल मोहन तिखे ( चिन्ह : छताचा पंखा), यशोदा गणेश सोनवणे( चिन्ह : टेबल) तसेच पद्मावती माता ग्रामविकास पॅनल कडून योगेश बाळासाहेब वाजे ( चिन्ह : फुटबॉल ), शितल गोविंद वाजे ( चिन्ह :अटो रिक्षा ), कौसल्या सत्यवान सोनवणे ( चिन्ह : नारळ ) हे सहा उमेदवार सदस्य पदासाठी रिंगणात उतरले असून यांच्यात लढत होणार आहे.
कोमल अमीत सोनवणे, निलम योगेश वाजे , स्वाती दिपक वाजे, मंगल सोमनाथ मांजरे , सिमा गणेश वाजे या पाच उमेदवारांनी थेट सरपंच पदांसाठी भरलेले अर्ज मागे घेत निवडणूकीतून माघार घेऊन आपापल्या पॅनलच्या उमेदवारांना पाठींबा देणार असल्याचे सांगितले
बिनविरोध झालेले उमेदवार सुरज मधूकर तिखे, औदुंबर शिवाजी भोंडवे, रामदास काका मांजरे , सुरेखा रमेश मांजरे व श्वेता भानुदास मांजरे या पाच उमेदवारांची सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांनी सर्वांचे अभिनंदन केले व पुढील राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या !