प्रतिनिधी : अल्लाउद्दीन अलवी
बाभुळसर बु : दि २६ मांडवगण फराटा तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील माजी सैनिक व माजी सरपंच शिवाजी अण्णा कदम व सामाजिक कार्यकर्ते अंकुशराव जगताप यांनी २५/१०/२०२३ पासून आमरण उपोषण मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी पाठिंबा व्यक्त केला आहे .
मांडवगण फराटा मध्ये सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना या ठिकाणी गावबंदी करण्याचा सकल मराठा समाजाने निर्णय घेतला आहे असे यावेळी सांगण्यात आले. तसेच आसपासच्या पंचक्रोशीतील सकल मराठा समाजातील. ग्रामस्थ महिला भगिनींनी या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी भेट दिली. शासनाने लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे. अशा घोषणा देण्यात आली.