नात्याला काळीमा फासणारी घटना चुलत्याकडून अल्पवयीन पुतणीवर लैंगिक अत्याचार

 

प्रतिनिधी लोणीकंद 

लोणीकंद (ता.हवेली) : काका आणि पुतणीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. घरात झोपलेल्या अल्पवयीन पुतणीसोबत गैरकृत्य करण्याचा प्रयत्न करत तिचा विनयभंग केला.

 

दरम्यान, आरोपीने एक वर्षापूर्वी तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. हा प्रकार वाघोली परिसरात घडला आहे. याप्रकरणी ३२ वर्षाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.

 

याबाबत पीडित मुलीच्या आईने सोमवारी (दि.२३) लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आहे. त्यानुसार फिर्यादी यांच्या ३२ वर्षाच्या दिरावर आयपीसी 354, 376(2)(एन), 323, 506 सह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सोमवारी (दि.२३) दुपारी चारच्या सुमारास घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची १६ वर्षाची अल्पवयीन मुलगी फिर्यादी यांच्या दुकानाशेजारी असलेल्या खोलीत झोपली होती. त्यावेळी आरोपीने मुलीसोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला.

 

त्यावेळी पीडित मुलीने आरडा ओरडा केल्याने फिर्यादी या खोलीत आल्या. त्यांनी मुलीला आरोपीच्या तावडीतून सोडवले. मुलीने आरडा ओरडा केल्याने आरोपी तेथून निघून गेला. त्यानंतर फिर्यादी यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी विरुद्ध तक्रार दिली. दरम्यान, आरोपीने जुलै व ऑगस्ट २०२२ मध्ये फिर्यादी यांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें