लोणीकंद पोलिसांची दमदार कामगिरी हॉस्टेलमधून विद्यार्थ्यांचे मोबाईल, लॅपटॉप चोरणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या

 

प्रतिनीधी लोणीकंद

वाघोली ( ता. हवेली) : येथील कॉलेज परिसरातील हॉस्टेलमध्ये प्रवेश करुन विद्यार्थ्यांच्या रुममध्ये चार्जिंगला लावलेले मोबाईल, लॅपटॉप चोरी करणाऱ्या चोरट्याच्या लोणीकंद पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.आरोपीकडून पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील १८ गुन्हे उघडकीस आले असून १० लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

निलेश प्रफुलचंद कर्नावट (वय- ३९ रा. मुपो नांद्रा, ता. पाचोरा, जि. जळगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ही कारवाई १५ ऑक्टोबर रोजी रायसोनी कॉलेज परिसरात केली. लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील कॉलेज परिसरातील हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांनी रुममध्ये चार्जिंगसाठी लावलेले मोबाईल, लॅपटॉप पहाटेच्या सुमारास चोरीला गेल्याच्या तक्रारी पोलिसांना मिळाल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करुन चोरट्याचा शोध सुरु केला.

लोणीकंद पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी रायसोनी कॉलेज परिसरात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार फरांदे यांना माहिती मिळाली की, रायसोनी कॉलेज परिसरात लॅपटॉप चोरी करणारा चोरटा कॉलेजच्या मुख्य गेट समोर उभा आहे. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.पोलिसांनी चोरी झालेल्या घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी सीसीटीव्हीमध्ये दिसणारा चोरटा आणि ताब्यात घेतलेला आरोपी एकच असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याच्याकडे सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याने पुणे शहरातील रायसोनी कॉलेज, सिंहगड कॉलेज, सिम्बॉयसेस कॉलेज, एमआयटी कॉलेज, वारजे माळवाडी, देहू, बिबवेवाडी, लोणावळा परिसरातून लॅपटॉप चोरल्याचे कबुल केले.आरोपीची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन त्याच्याकडून वेगवेगळ्या कंपनीचे २७ लॅपटॉप, १ टॅब व १ मोबाईल असा एकूण १० लाख ८० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीकडे केलेल्या तपासामध्ये लोणीकंद, भारती विद्यापीठ, वारजे, बिबवेवाडी, वानवडी, लोणी काळभोर व दिघी पोलीस ठाण्यातील गुन्हे उघडकीस आले आहेत. पुढील तपास पोलीस नाईक अजित फरांदे करीत आहेत.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त परिमंडळ – ४ शशिकांत बोराटे, सहायक पोलीस आयुक्त येरवडा विभाग संजय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे पोलीस निरीक्षक गुन्हे मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव,रविंद्र गोडसे, पोलीस उप निरीक्षक बाळासाहेब सकाटे, पोलीस अंमलदार संदीप तिकोणे, अजित फरांदे, सागर जगताप, विनायक साळवे, स्वप्नील जाधव, कैलास साळुंके, अमोल ढोणे, आशिष लोहार, पांडुरंग माने, मल्हारी सपुरे, साई रोकडे, दिपक कोकरे, शुभम चिनके, सचिन चव्हाण यांच्या पथकाने केली.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें