प्रतिनिधी लोणीकंद
लोणीकंद (ता हवेली ): लोणीकंद ग्रामपंचायत अंतर्गत व पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व पीडीसीसी बँकेचे विद्यमान संचालक प्रदीप विद्याधर कंद यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दि.२३ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता कृष्णकुंज फेज १ आणि वैष्णवी पार्क लोणीकंद येथील बंदिस्त गटर लाईन कामाचे भूमिपूजन माजी आदर्श सरपंच श्रीकांत कंद यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपस्थित विद्यमान सरपंच प्रियंका झुरुंगे, उपसरपंच राहूल शिंदे, ग्रा सदस्य नंदकुमार कंद,सागर कंद, सुधीर कंद,ओंकार कंद ,आशिष गायकवाड, गौरव राजाराम झुरुंगे,कावेरी सुनील कंद ,दिपाली महेश राऊत, सुजाता अमृत कंद,मोनिका कंद, सरस्वती दळवी, डॉ. सोनाली जगताप, सुलोचना झुरुंगे,सुप्रिया कंद,ग्रामविकास अधिकारी जालिंदर बोरावणे,मा.ग्रा सदस्य रामभाऊ ढगे, विवेक मगर, अक्षय मगर, राजू ढगे, शुभम कंद, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
गावातील वाड्या वस्तीवर, प्लॉटिंग मधील वाढत्या लोकसंख्येमुळे आरोग्याच्या दृष्टीने गटर लाईन अत्यंत गरजेची आहे यामुळे लोणीकंद ग्रामपंचायतीने याची दखल घेत त्वरीत बंदिस्त गटर लाईनचे काम मंजूर करून प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ केल्याचे ग्रा.सदस्य अतुल मगर यांनी “शिरूर हवेली ” शी बोलताना सांगितले.