प्रतिनिधी पुणे
मुंबई: (दि१७) भारत आणि आशियाई राष्ट्रांमधील परस्पर संबंध अधिक दृढ होण्यासाठी प्रयत्न करतानाच महाराष्ट्रात औद्योगिक गुंतवणूकीसाठी पोषक वातावरण असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते राजदूतांचा आणि उच्चायुक्तांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा, विकास आयुक्त दीपेद्रसिंह कुशवाह आदी यावेळी उपस्थित होते.
शिष्टमंडळामध्ये ब्रुनेई दारुस्सलामचे उच्चायुक्त डाटो अलाहुद्दिन हज मोहम्मद ताहा, कंबोडियाचे राजदूत काय क्युओंग, इंडोनेशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाचे मसनी एरिझा, सचिव हैदी नूर हशफी, लाओसचे राजदूत बौनमे, मलेशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अर्निझल फेडझिल राजाली, कौन्सुल जनरल अहमद झुवैरी युसुफ, नोरमन झ्युलकार्नेन मोहम्मद नसरी, म्यानमारचे राजदूत मोय क्यॉ ऑंग, सिंगापूरचे उच्चायुक्त सायमन वॉंग, कौन्सुल जनरल ऑंग मिंग फुंग, थायलंडच्या राजदूत श्रीमती पट्टारल हॉंगटॉंग, सचिव थानचॉंक युथाऐवन, कौन्सुल जनरल दोन्नावित पूलसावत, व्हिएतनामचे कौन्सुल जनरल ले कॉंग बिएन यांचा समावेश होता.