पुणे (लोणीकंद ) दि. १३ : दुर्गामाता दौड म्हणजे तमाम हिंदूंच्या एकतेचे प्रतीक भगव्या झेंड्याच्या नेतृत्वाखाली राष्ट्र जागरणासाठी केलेली वाटचाल जगाचा उद्धार करणाऱ्या माता जगदंबेचा जयजयकार आणि भारत मातेच्या रक्षणासाठी केलेला जयघोष.
सालाबादप्रमाणे यंदाची सुरूवात रविवारी दि. १५ सकाळी पहाटे ५ वाजून ३० मिनिटांनी गावातील महिला येऊन स्तोत्र पठण करून व ६ वाजून ३० मिनिटांनी सर्वांनी एकत्र येऊन दौडेला सुरुवात लोणीकंद गावातील ग्रामस्थपंचायत मुख्य चौकातून दुर्गा माता दौडचे आयोजन करण्यात आले असून या नऊ दिवसांच्या उत्सवादरम्यान गावातील विविध देवींची सामूहिक आरती केली जात आहे. व समारोप प्रेरणामंत्राने होतो. गावातील तरुणी, बाल- तरुण महिलांचाही उत्स्फूर्तपणे दौडमध्ये मोठा सहभाग असतो.
याप्रसंगी विविध मंदिरांमध्ये आरती केली जाते व महिला ध्वजाचे औक्षण करून स्वागत करतात. दुर्गामाता दौडमध्ये सामूहिक, धार्मिक गीत गायन केले जात असून यंदा दि. १५ ते दि. २४ या १० दिवसांत हा उपक्रम सुरू राहणार असून परीसरात ग्रामस्थांनी उपस्थित राहावे हि विनंती लोणीकंद नवरात्रउत्सवाच्या आयोजिकांनी केली आहे
.