चाकण येथील घटना:सार्वजनिक ठिकाणी महिलेसोबत गैरवर्तन, तरुणाला अटक

 

पुणे (चाकण): पतीसोबत सार्वजनिक ठिकाणी थांबलेल्या महिलेसोबत गैरवर्तन करुन तिला मारहाण केली तर याबाबत जाब विचारणाऱ्या महिलेच्या पतीलाही शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना चाकण येथे घडली आहे.घटना बुधवारी (दि.११) चाकण येथील माणीक चौकातील एका मोबाइल शॉपीसमोर सकाळी साडेसातच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी एका माथेफिरूला अटक केली आहे.

 

याबाबत ३२ वर्षाच्या महिलेने चाकण पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.१२) फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी बायु उर्फ कुमार जालिंदर ईनकर (वय-२५ रा. स्वप्ननगरी, चाकण, ता. खेड) याच्यावर आयपीसी ३५४ (अ ), ३२३ ५०४ नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी फिर्यादी या माणीक चौकातील एका मोबाईल शॉप समोर पतीसोबत थांबल्या होत्या. त्यावेळी आरोपी त्यांच्याकडे वाईट नजरेने पाहत होता. त्यामुळे फिर्यादी या थोड्या बाजूला गेल्या असता आरोपी त्यांच्याजवळ आला. त्याने फिर्यादी यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करुन गैरकृत्य केले. त्यावेळी त्यांनी आरोपीला विरोध केला असता त्याने महिलेच्या कानाखाली मारली.

 

यावेळी महिलेच्या जवळ उभ्या असलेल्या पतीने पत्नीला का मारले अशी विचारणा आरोपीकडे केली.त्यावेळी आरोपीने फिर्य़ादी यांच्या पतीला देखील हाताने मारहाण करुन शिवीगाळ केली.

महिलेच्या तक्रारीवरुन आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें