प्रतिनिधी लोणीकंद
शिरूर तालुक्यातील जातेगाव बुद्रुक येथील व्यंकटेशकृपा शुगर मिल्स कारखान्याच्या गोदामामधून अडीच लाख रुपयांच्या केबलची चोरी झाली. याबाबत सुरक्षा रक्षक बबनराव बाळासाहेब शिंदे (वय ५१, रा.शिंदेवाडी-अष्टापूर, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपासात २ लाख ५४ हजारांची केबल चोरीला गेली आहे.
कारखाना परिसरात मोठ्या प्रमाणात गावठी दारू तसेच बेकायदा दारू विक्री सर्रास सुरू असून, त्यातील काही दारुडे चोरीचे प्रकार करीत असल्याने पोलिसांनी तत्काळ बेकायदा दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी ऊस तोड मजुरांकडून करण्यात आली.