महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून चोरटे पसार शिसवडी येथील घटना 

 

प्रतिनिधी लोणीकंद 

शिरसवडी (ता.हवेली): (दि.०५/१०/२०२३ रोजी सायं ७:१० वा.) लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावडेवाडी (नागवडेवस्ती), शिरसवडी, ता.हवेली, जि.पुणे येथील घरासमोरील अंगणात बसलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र मोटार सायकलवर आलेल्या दोन अनोळखी इसमांनी हिसकावून पसार झाले.

 

या प्रकरणी त्या महिलेने (वय-३४ वर्षे), रा.गावडेवाडी, शिरसवडी, पुणे लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली व फिर्याद दिली. लोणीकंद पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार यांनी पो.स्टे. गुन्हा रजिस्टर नंबर ८०६ / २०२३, भादविक कलम, ३९४,३४ च्या अंतर्गत मोटार सायकलवरील आलेल्या दोन अनोळखी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

पोलीसांकडुन मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार फिर्यादी महिला, वय – ३४ वर्षे, रा.गावडेवाडी, शिरसवडी, पुणे येथील घ.ता.वेळ दिनांक ०५/१०/२०२३ रोजी १९/१० वा. सदरील ठिकाणी फिर्यादी हया त्यांचे घरासमोरील अंगणातील ओट्यावर बसले असताना, यातील नमुद दोन अनोळखी इसमांनी संगनमत करून, मोटार सायकलवर येऊन, अचानक फिर्यादी यांचे गळ्यातील ३५०००/- हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावुन, त्यांचे डावे हातावर चाकुने वार करून, त्यांना गंभीर दुखापत करून, जबरी चोरी करून चोरटे पसार झाले. या प्रकरणी कोणालाही अटक झालेली नाही पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक, गोडसे हे करीत आहे.

 

 

 

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें