पुण्यातील खडकी, लोणीकंद, चतु:श्रृंगी, कोंढवा परिसरात घरफोडी, सोने चांदीच्या दागिन्यांसह १२ लाखांचा ऐवज लंपास

 

प्रतिनिधी लोणीकंद 

लोणीकंद (ता. हवेली): पुणे शहरामध्ये विविध ठिकाणी घरफोडी करुन चोरट्यांनी सोने-चांदीच्या दागिन्यासह १२ लाख १४ हजार २४८ रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला आहे. घरफोडीच्या घटना खडकी पोलीस स्टेशन, लोणीकंद पोलीस स्टेशन,चतु:श्रृंगी पोलीस स्टेशन, कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या असून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

बोपोडी येथील बंद फ्लॅटचा दरवाजा व कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. बेडरुमधील कपाटात ठेवलेले ६ ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण २४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. याबाबत राजीव अनिलचंद्र घोष (वय- ५४ रा. आयोध्या नगरी, शिंदे गार्डन सोसायटी, बोपोडी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ३ ऑक्टोबर रोजी रात्री १० ते ४ ऑक्टोबर सकाळी ६:३० च्या दरम्यान घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात आयपीसी ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गुंजाळ करीत आहेत.घरफोडीची दुसरी घटना लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. ही घटना १४ सप्टेंबर रोजी पहाटे तीन ते दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याबाबत सत्यप्रकाश अचितानंद यादव (वय-३८ रा. गोकुळ पार्क, फेज-१, जानकी निवास, बकोरी रोड, लोणीकंद) यांनी फिर्य़ाद दिली आहे. लोणीकंद पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात आयपीसी ४५७, ४५४, ३८० नुसार गुन्हा दाखल केला आहे. चोरट्यांनी फिर्यादी यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील दीड लाख रुपये किमतीचे ५ तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले आहेत. पुढील तपास लोणीकंद पोलीस ठाण्याचे हवालदार सकाटे करीत आहेत.

 

 

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें