“संभाजी ब्रिगेड ” पुणे जिल्ह्याच्या वतीने शिरूर लोकसभा, व विधानसभा निहाय सदस्य नोंदणी व पत्रक वाटून जनसंपर्क अभियानास सुरुवात

 

प्रतिनिधी लोणीकंद 

पुणे:  आगामी काळात येणाऱ्या लोकसभा,व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीसाठी  संभाजी ब्रिगेडच्या वतीने शिरूर लोकसभा मतदारसंघ सदस्य नोंदणी व जनसंपर्क अभियान आयोजित करण्यात आले होते,राज्याचे नेते व संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोजदादा आखरे व महासचिव सौरभदादा खेडेकर यांच्या नेतृत्वात शिरूर लोकसभा मतदारसंघात जास्तीजास्त सदस्य नोंदणी व मतदार जोडण्यासाठी, संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी पत्रक वाटून जनतेशी संवाद साधून पक्षाची मोर्चे बांधणी करीत आहेत. 

यावेळी शिरूर तालुकाध्यक्ष अक्षय गायकवाड जिल्हा सचिव निलेश ढगे, जिल्हा उपाध्यक्ष निलेश कांबळे, शिरूर लोकसभाध्यक्ष संदीप भाऊ मुंगसे, जुन्नर तालुकाध्यक्ष संजय वराडी, जुन्नर पूर्व अध्यक्ष राजाराम गाजरे, जुन्नर प्रवक्ते प्रवीण सोनवणे, कृष्णा डोके यांच्यासह अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

शिरूर लोकसभा मतदारसंघात संभाजी ब्रिगेडच्या वतीने एक लाख पत्रक देण्यात येणार आहेत, येणाऱ्या काळात संभाजी ब्रिगेड ची ताकद इतर राजकीय पक्षाला दिसेल, संभाजी ब्रिगेड शिरूर विधानसभा व जुन्नर विधानसभा लढवणार आहे, त्या अनुषंगाने संभाजी ब्रिगेडच्या वतीने सदस्य नोंदणी चालू आहे, तसेच शिरूर लोकसभा निवडणूक लढवण्याची सुद्धा संभाजी ब्रिगेड तयारी ठेवणार आहे, असे संभाजी ब्रिगेड चे पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी सांगितले,

२०१९ साली संभाजी ब्रिगेड ने शिरूर लोकसभा निवडणूक लढवली होती, आणि ह्या वेळेस संभाजी ब्रिगेड पुर्ण ताकदीने उतरून जनतेसमोर जाणार आहे, व त्यांचे प्रश्न जाणुन घेऊन तो संभाजी ब्रिगेड च्या माध्यमातून सोडवणार असल्याचे संभाजी ब्रिगेड चे २०१९ चे उमेदवार राहिलेले व शिरूर लोकसभा निरीक्षक शिवाजी उत्तम पवार यांनी ग्वाही दिल्याची “शिरूर हवेली न्यूज ” शी बोलताना सांगितले.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें