प्रतिनिधी: महेंद्र नागवडे
बाभुळसर बु (ता.शिरूर): दि.७ येथे पुणे जिल्हा नियोजन समिती माध्यमातून आणि मा.पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या निधीतून मंजूर ५ लक्ष्य सिमेंट काँक्रिट रस्त्याचे व ग्रामपंचायत १५ वा वित्त आयोग अंतर्गत ड्रेनेज लाईन कामाचे उद्घाटन आज सरपंच दिपाली नागवडे यांच्या हस्ते नारळ फोडून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.
यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये मा.सरपंच आणि विद्यमान सदस्य गणेश माचाले, संत तुकाराम सोसायटी चेअरमन सुनील दादा नागवडे, सदस्या कविता पाटोळे, नंदा कांबळे मा.सरपंच, डॉ.आशा कळसकर, राधा रणदिवे,रुक्साना अल्वी, संभाजी मचाले, डेअरी चेअरमन दत्तात्रय वाल्मीक नागवडे, जनार्दन टेकवडे, श्री दत्त पतसंस्था मा.चेअरमन दिलीप नागवडे, संत तुकाराम सोसायटी संचालक शरद बाबूराव नागवडे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष महेंद्र नागवडे, शिरूर तालुका सोशल मीडिया अध्यक्ष सतीश नागवडे, तंटामुक्ती सदस्य संतोष टेकवडे, राजेंद्र नागवडे, प्रकाश रणदिवे मा.सदस्य, किशोर पंडित नागवडे, कॉन्ट्रॅक्टर अमित मचाले, संगणक परिचारक अमित नागवडे, ग्रामविकास अधिकारी उत्तम गायकवाड, शिपाई संतोष भंडलकर यांच्यासह आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या कामाबरोबर रस्त्याच्या मधोमध ड्रेनेज लाईनसाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून १५ वा वित्त आयोग अंतर्गत १,३०,००० रुपये निधी उपलब्ध करून कामास सुरुवात केली. तर गावातील प्रत्येक घराची ड्रनेज या लाईनला जोडले जाणार आहे,त्यामुळे गाव रोगराई मुक्त होईल.यावेळी सरपंच दिपाली महेंद्र नागवडे यांनी “शिरूर हवेली न्यूज” शी बोलताना सांगितले
.