कोंढवा खडीमशिन चौक-ते येवलेवाडी रस्त्याची झालेली दुरवस्था (संदिप डोके हडपसर)
हडपसर दि.(प्रतिनिधी संदिप डोके)
पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या कोंढवा खडीमशिन चौक ते येवलेवाडी लेप्रेसी हॉस्पीटल दरम्यान रस्त्याचे गेल्या २५ वर्षात एकदाही काम झाले नाही रस्त्यात खड्डा कि खड्यात रस्ता अशी परस्थिती येथे झाली असुन अपघाताचा प्रमाणात वाढ होऊन नाहक निष्पाप लोकांचे जीव जात आहे तरी ही मनपा प्रशासन याकडे डोळे झाक करुन गप्प बसली आहे असा संतप्त सवाल करीत त्वरीत रस्त्याचे डांबरीकरन करावे अन्यथा खड्यात बसण्याचे आमंत्रण अधिकार्यांना देणार असुन तिव्र जनआंदोलन करण्याचा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य दशरथ काळभोर यांनी दिला आहे
कोंढवा-येवलेवाडी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत त्यामुळे वहानांचे नुकसान होत असुन रोज छोटे मोठे अपघात होत आहे
रस्ता दुरुस्तीची मागणी पालिका प्रशासनाकडे करुन देखील टाळाटाळ करीत आहे काही ठिकाणी पथविभाग कार्यालयाच्या माध्यमातुन रस्त्यावर मुरुम टाकण्यात आला मात्र मुरुमाचा चिखल होऊन दुचाकी गाड्या सरकत आहेत रस्त्यावरील खड्डे डांबर टाकुन बुजवावेत तसेच संपुर्ण रस्त्याचे डांबरीकरण करावे व सरक्षिततेच्या योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य दशरथ काळभोर यांनी केली आहे .
कोंढवा,येवलेवाडी ,पिसोळी परिसराचे नागरीकरण झपाट्याने वाढत आहे मात्र नागरीकांच्या तुलनेत रस्ते उपल्बध नाहीत कोंढवा-येवलेवाडी रस्ता अरुंद असुन खड्डे मय झाल्याने मृत्युचा सापळा बनला आहे लवकरात लवकर रस्त्याचे काम पालिका प्रशासनाने करावे अन्यथा तीव्र जनआंदोलन करण्यात येईल.(दशरथ काळभोर माजी जिल्हा परीषद सदस्य)
सध्या डांबराचा तुटवडा असुन सध्या मुरुम टाकुन तात्पुरती रस्ता दुरुस्तीचे काम सुरु आहे डांबर उपलब्ध होताच रस्त्याचे डांबरीकरण केले जाईन(सुधीर चव्हाण कार्यकारी अभियंता पथ विभाग)
_____________________________________