प्रतिनिधी लोणीकंद
पिंपळे जगताप (ता. शिरूर): येथील तांबे वस्तीत येथे गेली वर्षभरापासून विद्युत रोहित्राचे पोल उभे असूनही या ठिकाणी विद्युत रोहित्र बसविले नव्हते. भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे यांनी पाठपुरावा केल्यानंतर अवघ्या आठवड्यात त्या ठिकाणी विद्युत रोहित्र बसवले गेल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
जयेश शिंदे यांनी पंधरा दिवसांपासून विद्युत वितरण विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप दरवडे व उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन यांच्याकडे पाठपुरावा केल्याने सदर ठिकाणी नवीन रोहित्र बसवत लोकार्पण केले
याप्रसंगी विद्युत वितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन, जयेश शिंदे, चेअरमन संतोष सोंडेकर, माजी चेअरमन निलेश फडतरे, प्रताप तांबे, मोहन तांबे, महेश जगताप, माजी सरपंच शिवाजी जगताप, गजानन सोंडेकर,
आबासाहेब तांबे, भाऊसाहेब बेंडभर, मोहन भुजबळ, दत्तात्रय तांबे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. ठेकेदाराच्या अडचणीमुळे रोहित्र बसवले गेले नसल्याने उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन यांनी सांगितले, दरम्यान शेतकऱ्यांचाप्रश्न सुटल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.