स्वरुप संप्रदाय पुणे जिल्हा यांच्या वतीने शिक्रापुर येथे श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज पादुका दर्शन सोहळ्यात प्रदिपदादा कंद यांची उपस्थिती.

 

लोणीकंद (प्रतिनिधी): ३ ऑक्टोबर रोजी शिक्रापुर तालुका शिरुर येथे जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीजधाम श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पादुका दर्शन सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन अतिशय नेटके व सुंदर करण्यात आले होते. या संपुर्ण सोहळ्याचा प्रारंभ पादुका व गुरुपुजनाने करुन आरती सोहळा, प्रवचन, उपासक दिक्षा, दर्शन व पुष्पसृष्टीने समारोप करण्यात आला.

 

यावेळी कार्यक्रम प्रसंगी संचालक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व मा अध्यक्ष जिल्हा परिषद पुणे आदरणीय प्रदिपदादा विद्याधर कंद यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की महाराष्ट्राच्या भुमीला संताची परंपरा आहे. मानवी जीवनातील चढउतारावर भक्कमपणे उभे राहण्यासाठी आध्यात्मिक आधार तसेच जीवनमुल्यांचे योगदान अशा संतविचाराच्या सानिध्यात मिळत आहे. जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान यांच्या वतीने आध्यात्मिक विचारांचे मोठे वलय संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झाले आहे. संस्थानच्या वतीने महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल गरजूंना मदत दिली जात आहे. राज्यातील सहा राष्ट्रीय महामार्गावर रुग्णवाहिका कार्यरत आहे. शेतकरी आत्महत्या बाबत प्रबोधन करत दुष्काळ, आरोग्य सेवा व महिला सबलीकरण यासाठी मोठ्या प्रमाणावर संस्थानच्या माध्यमातून समाजाभिमुख कार्य केले आहे ही आनंदाची गोष्ट आहे. मोफत शिक्षण, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा, वृक्षारोपण याबरोबरच कोरोना काळातही मोठे योगदान संस्थानच्या माध्यमातून झालेले आहे.

 

यावेळी कार्यक्रम प्रसंगी जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे, मा.जि. परिषद सदस्य राहुलदादा पाचार्णे, रेखाताई बांदल, स्वातीताई पांचुदकर, रोहिणीताई सासवडे, भाजपा पुणे जिल्हा महिला अध्यक्षा पुनमताई चौधरी, मा.आदर्श सरपंच रामभाऊ सासवडे, शिरुर कृषी उत्पन्न बाजार समिती चे मा.सभापती दत्तात्रय हरगुडे, शिवसेना जिल्हा प्रमुख बापूसाहेब शिंदे, मा.पंचायत समिती सदस्य विक्रम पांचुदकर, ग्रामपंचायत सदस्या शालनताई राऊत, सारीकाताई सासवडे कृष्णा सासवडे, युवराज मांढरे, मा ग्रामपंचायत सदस्य परमेश्वर चौधरी,विविध कार्यकारी सोसायटी चे चेअरमन संजुभाऊ शिवले उद्योजक दत्तात्रय पांचुदकर, राजेशजी लांडे, विजुआण्णा लोखंडे, अतुल सासवडे, गणेश गायकवाड व पदाधिकारी ग्रामस्थ महिला भगिनी भाविक भक्त गण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

00:37