हडपसर दि.४(प्रतिनिधी)
आंबेगाव तालुक्यातील नारोडी येथे स्व.श्री.गोविंदराव सगाजी हुले (मा.सरपंच) स्व. श्रीम.कृष्णाबाई गोविंद राव हुले,स्व.रामदासशेठ गोविंद राव हुले यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री मुक्तादेवी ज्येष्ठ नागरिक संघ नारोडी यांस एक कपाट भेट म्हणून देण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सोपानराव हुले सर, उपाध्यक्ष विठ्ठल राव मोरे, सचिव विठ्ठलराव पिंगळे, खजिनदार रामदास हुले,सहखजिनदार रामदास वाघमारे, संचालक सुभाष हुले सर,निवृत्ती तोत्रे, तसेच सर्व पदाधिकारी, संचालक व सभासद, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे निमित्ताने वडिल,आई व बंधू यांच्या पुण्यस्मरणार्थ आर.जी हुले सर,गोरक्षनाथ गोविंद राव हुले, दिलीपराव गोविंदराव हुले, विलास रामदासशेठ हुले यांजकडून श्री मुक्तादेवी ज्येष्ठ नागरिक संघासाठी एक कपाट भेट म्हणून देण्यात आले. यावेळी रोहिदास हुले सर,सोपानराव हुले सर व नारायण पाटील हुले , विठ्ठलराव पिंगळे,यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी हभप निवृत्ती महाराज हुले यांचे प्रवचन झाले ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने तिनं ही बधुंचे ऋण व्यक्त करून सर्व उपस्थितांचे स्वागत व आभार आर.जी.हुले सर यांनी मानले.
नारोडी येथे जेष्ठ नागरीक संघास कपाट भेट देताना आर जी हुले सर व उपस्थित जेष्ठ नागरीक (छाया:संदिप डोके हडपसर)