वाजेवाडी गावातील तरूणांनी गणपती मिरवणुकीचा खर्च वाचवत मतिमंद व अनाथ मुलांना वस्तू वाटप

 

प्रतिनिधी/ वाजेवाडी 

वाजेवाडी (ता.शिरूर) : लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने सार्वजनिक गणेश उत्सव सुरू केला तोच आदर्श वाजेवाडी गावचे मा. उपसरपंच अमित सोनवणे यांनी व यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील तरूणांनी ठेवून दहा दिवस “श्री गणरायाची” मनोभावे नित्यपूजा करून डीजे व मिरवणुकीचा खर्च वाचवून वाजेवाडीतील चंद्रप्रकाश फाउंडेशन सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालय येथील  मतिमंद व अनाथ गरजू मुलांना वस्तू दिल्या.

यावेळी “धर्मवीर संभाजी राजे” मित्र मंडळाचे संस्थापक अमित तानाजी सोनवणे,श्रीगणेश मंडळ अध्यक्ष सचिन जगताप, कामगार संघटनेचे अध्यक्ष दत्ता तांबे, सत्यम संदीप सोनवणे (अध्यक्ष),खुशाल सोनवणे (उपाध्यक्ष),गौरव गायकवाड (कार्याध्यक्ष),सुमित गुंजाळ (उपकार्याध्यक्ष), वैभव सोनवणे (खजिनदार),अभिजित सोनवणे (सचिव) रोहन सोनवणे (आयोजक),सौरव सोनवणे (उत्सव प्रमुख), कमलेश बेंडभर (आयोजक),हेमंत भोर (नियोजन प्रमुख), अर्थव रिठे (संयोजक), सदस्य आदेश भोर, केतन धनावडे ,आदित्य रिठे ,हर्षवर्धन सोनवणे,महेश सोनवणे, तसेच सेवाधाम संस्थेचे प्रमुख पवन सर, कटारमल, यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते, आजी-माजी पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते .

आजच्या काळात दिवसेंदिवस हिंदू संस्कृतीचे रूढी परंपरेचे जतन होत नाही आपल्या गणपती बाप्पा समोरच आपणच वेगळी गाणी वाजवत असून वेड्यावाकड्या पद्धतीत नाचतो याला कुठेतरी आळा बसावा व आपली हिंदू संस्कृती इथून पुढील काळात सर्व तरुणांनी जपावी ह्या दृष्टिकोनातून वाजेवाडी गावातील “धर्मवीर संभाजी राजे” मित्र मंडळ व सणसवाडी येथील ऑलिकॉन कामगार संघटना या गणेश उत्सव मंडळानी गणपती बाप्पाचे विसर्जन खर्च विरहित करून सेवाधाम मतिमंद मुलांच्या शाळेमध्ये जाऊन गरजेनुसार त्यांना वस्तू देऊन आजच्या तरुणांच्या पुढे एक आदर्श निर्माण करण्यासाठी आम्ही सर्वांनी अशा पद्धतीने विसर्जन सोहळा पार पाडण्याचे ठरवले.

या पुढील काळात येणारे सार्वजनिक उत्सव देखील अशा प्रकारे करण्याचा निर्णय दोन्ही मंडळांनी व वाजेवडी गावातील तरुणांनी घेतला असल्याचे संस्थापक अमित सोनवणे यांनी “शिरूर हवेली न्यूज” शी बोलताना सांगितले.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें