लोणीकंद प्रतिनिधी
शिरूर तालुक्यातील वाजेवाडी येथील विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी नुकतीच हरिभाऊ धर्मराज वाजे यांची बिनविरोध निवड करण्यात आली विद्यमान चेअरमन ज्ञानेश्वर बक्षीराम वाजे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी सोसायटी कार्यालयात निवडणूक घेण्यात आली यावेळी हरिभाऊ धर्मराज वाजे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची चेअरमन पदी निवड झाली असल्याचे सचिव अनिल कुंभार यांनी जाहीर केले.
यावेळी मा.सरपंच धर्मराज वाजे, शिवाजी भोंडवे, अशोक वाजे,संचालक दत्तोबा चौधरी, रंगनाथ वाजे, शोभा अशोक वाजे, किसन वाजे, अनिल मलघे, संतोष भोंडवे, नितीन वाजे, माऊली चौधरी, सुरेश नाना वाजे, उत्तम तिखे, अनिल वाजे,पप्पू वाजे, यांच्यासह आजी – माजी सरपंच, उपसरपंच , पदाधिकारी, चेअरमन संचालक व सोसायटीचे सर्व सभासद व वाजेवाडी समस्त ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ग्रामस्थांच्या वतीने हरिभाऊ धर्मराज वाजे यांचा शाल पुष्पहार घालून अभिनंदन करण्यात आले.तर सोसायटीच्या माध्यमातून सर्व सभासदांचे आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे हरिभाऊ धर्मराज वाजे यांनी ‘शिरूर हवेली न्यूज” शी बोलताना सांगितले.