Home महाराष्ट्र “बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्था” मर्यादित गतवर्षी १२ टक्के लाभांश जाहीर

“बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्था” मर्यादित गतवर्षी १२ टक्के लाभांश जाहीर

0
“बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्था” मर्यादित गतवर्षी १२ टक्के लाभांश जाहीर

 

 

 

निघोज (ता.पारनेर) : येथील “बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्था” मर्यादित निघोज पुष्कर लॉन्स, नायरा पंपा समोर, निघोज शिरूर रोड, तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर येथे रविवार दि.२४/०९/२०२३ रोजी पतसंस्थेची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पतसंस्थेचे चेअरमन मा.वसंत बाबासाहेब कवाद यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांवर खेळीमेळीच्या वातावरणामध्ये नुकतीच संपन्न झाली.

 

यावेळी  मा. वसंत  बाबासाहेब कवाद, (चेअरमन), नामदेव आबाजी थोरात, (व्हा.चेअरमन), तसेच संस्थेचे संचालक चंद्रकांत प्रभू लामखडे ॲड. बाळासाहेब मारुती लामखडे, दामू देवराम लंके, भिवा देवराम रसाळ,पंढरीनाथ शंकर साळवे, सिदू मारुती कऱ्हे, बाबाजी बहिरू कळसकर, बाळशिराम हनुमंत डेरे, अभिजित बबनराव मासळकर , सतिष पोपट साळवे,दिलीप नाथू सोदक, सौ.लताबाई पोपट कवाद व सौ.वैशाली प्रकाश कवाद (संचालिका), शांताराम बापूराव कळसकर (तज्ञ संचालक) , ॲड.सुनिल कारभारी मेसे, ( तज्ञ संचालक ), सत्यवान राघू गुंड (कर्ज वितरण अधिकारी), शांताराम भिकाजी सुरकुंडे (उपव्यवस्थापक), बाळासाहेब बबन बोरुडे (वसुली अधिकारी), सुनील खंडू तांबे (प्रशासन विभाग प्रमुख), व (मुख्य कार्यकारी अधिकारी ) दत्तात्रय रंभाजी लंके यांच्यासह सभासद, हितचिंतक, ठेवीदार कर्मचारी आदी उपस्थित होते.

सभेच्या सुरुवातीस माननीय अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सभासद, कर्मचारी वृंद यांच्या वतीनेअहवाल सालात आपल्या देशाचे थोर देशभक्त, स्वातंत्र्य सेनानी, जवान,संशोधक कवी, साहित्यिक, कलावंत,सामाजिक राजकिय व सहकार चळवळीतील कार्यकर्ते तसेच आपल्या संस्थेचे मार्गदर्शक कै. उदयराव शेळके,संस्थेचे सभासद, ठेवीदार, हितचिंतक, ज्ञात व अज्ञात व्यक्ती दिवंगत झालेले आहेत त्यांना नम्रता पूर्वक सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

अहवाल वाचन संस्थेचे चेअरमन वसंत कवाद यांनी या सभेत सर्वांचे हार्दिक स्वागत करून प्रस्तावना केली, व संस्थेच्या वैशिष्ट्यबाबत व सोयी सुविधांबाबत सांगितले. तसेच सभासदांनी आपला पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर, पॅन नंबर, व ईमेल आयडी बदलाबाबत संस्थेस कळविण्याच्या सभासदांना नम्र सूचनाही केल्या संस्थेच्या अहमदनगर, पुणे, नाशिक, मुंबई या जिल्हात बारा व मुख्यलय अशा एकूण तेरा शाखा आहेत. या सभेत सभासदांना १२ टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला. संस्थेचा मागील वर्षीचा अहवाल वाचन संस्थेचे यांनी केले.संस्थेचे २६ वे वर्ष असून संस्थेकडे २९ कोटी ६६ लाख ७५ हजार ५७८ रुपयांचा निधी आहे तर १९० कोटी १३ लाख ६० हजार ५१५ रुपयांच्या ठेवी आहेत. संस्थेने १२४ कोटी ०६ लाख ३८ हजार ४९९ रुपयांचे कर्ज वाटप केले असून १०९ कोटी १४ लाख ६१ हजर ९१४ रुपयांची संस्थेची गुंतवणूक आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये पतसंस्थेला ०४ कोटी ११ लाख ४१ हजार ४७६ रुपयांचा नफा झाला असून संस्थेला सतत ऑडिट वर्ग अ आहे.

या झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करून दि. ३१ मार्च २०२३ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षाचा संचालक मंडळाने सादर केलेला अहवाल वैधानिक लेखापरिक्षण झालेले ताळेबंद व नफा-तोटा पत्रकावर विचार करून व स्वीकृत केला.सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या शासकीय लेखापरिक्षकांच्या लेखापरिक्षण अहवालावर विचार करून व स्वीकृत केला.सन २०२२-२३ या अहवाल सालातील संचालक मंडळाने सुचविलेल्या नफा विभागणीस मंजुरी देऊन व लाभांश जाहीर केला.सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठीच्या अंदाजपत्रकाची माहीती देऊन व मागील वर्षाच्या अंदाज पत्रकातील रक्कमेपेक्षा जास्त झालेल्या खर्चास मंजुरी दिली.संचालक मंडळ सदस्य व त्यांचे नातेवाईक यांना दिलेल्या कर्जाची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० कलम ७५ (२) नुसा माहिती घेण्याच्या सूचना दिल्या.सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या लेखापरीक्षणाचा दोष दुरुस्ती अहवाल व त्यावरील लेखापरीक्षकांच्या निर्देशांची नोंद घेऊन कार्यवाही केली.सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी कायदा / नियम यामधील तरतुदीनूसार बाहेरील कर्ज मर्यादा निश्चित केल्या सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरीता अंतर्गत लेखापरीक्षकांची नेमणूकीची व त्यांचे मानधन ठरविण्यास मंजुरी सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरीता निबंधकांनी जाहिर केलेल्या पॅनेलमधील पात्र वैधानिक लेखापरीक्षकांची नेमणूक करण्यास व लेखापरीक्षणासाठीच्या मानधनास मंजुरी दिली. रौप्य महोत्सव कार्यक्रमासाठी झालेल्या खर्चास कार्योत्तर मंजुरी शाखा कार्यालयासाठी जागा / इमारत खरेदी करणे बाबत विचार विनिमय झाला संस्थेच्या २६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस अनुपस्थितीत असलेल्या व अनुपस्थिती मंजुरीसाठी अर्ज केलेल्या सभासदांची अनुपस्थिती क्षमापित करून अध्यक्षांचे परवानगीने घेतलेले विविध विषय एकमुखाने मान्यता देऊन मंजुर केले.

संचालक बाळासाहेब लामखेडे यांनी सूत्रसंचालन केले व संस्थेचे चेअरमन मा.वसंत बाबासाहेब कवाद व संचालक शांताराम कळसकर यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय रंभाजी लंके यांनी “शिरूर हवेली न्यूज” ला दिली.