लोणीकंद (ता.हवेली): येथे केंद्र सरकार जल जीवन मिशन सिंचन योजना अंतर्गत मंजूर झालेल्या सहा लाख लिटर क्षमता असलेल्या पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन पुणे जिल्ह्याचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीपदादा कंद व कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रवींद्र कंद यांच्या मार्गदर्शनाखाली व लोणिकंद गावचे सरपंच प्रियंका झुरुंगे, उपसरपंच राहुल शिंदे, यांच्या हस्ते झाले.
यावेळी मा.उपसरपंच नंदकुमार कंद, ओंकार कंद, ग्रामपंचायत सदस्य सुधीर कंद, आशिष गायकवाड, अतुल मगर, सरस्वती गंगाधर दळवी, सोनाली जगताप, मा. सरपंच सुलोचना झुरुंगे, हभप गुलाबराव कंद, रामदास शिंदे, सुधीर शिंदे, संजय शिंदे, नितीन शिंदे, ग्रामविकास अधिकारी जालिंदर बोरावणे आदींसह लोणीकंदचे ग्रामस्थ व सदस्य उपस्थितीत होते.
या पाण्याच्या टाकीसाठी भैरवनाथ सोसायटीचे व्हाईस चेअरमन गुलाबराव आंदराव कंद, महेश विठ्ठलराव शिंदे, हरिश्चंद्र वाळूंज या मान्यवरांनी स्वतःची तीन गुंठे जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल लोणीकंद सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तसेच लोणीकंद ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले अशी माहिती मा. उपसरपंच नंदकुमार कंद यांनी “शिरूर हवेली न्यूज” ला दिली.