लोणीकंद प्रतिनिधी (ता. हवेली) भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविजय संकल्प २०२४ विधानसभा निवडणूक व्यवस्थापन शिरूर-हवेली विधानसभा संदीप भोंडवे, आंबेगाव विधानसभा संजय थोरात, खेड-आळंदी विधानसभा सचिन लांडगे यांना संयोजक पदी निवड करून जबाबदारी देण्यात आली.
संयोजकपदी नुकतीच निवड झालेले संदीप भोंडवे यांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली व जिल्हा परिषद मा.अध्यक्ष प्रदीप विद्याधर कंद, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, यांच्यासह भाजपाचे आजी-माजी पदाधिकारी लोणीकंद ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.