लोणीकंद (प्रतिनिधी): गिरीप्रेमींनी तुळापूर व वढू बुद्रुक येथील शौर्यपीठ श्री छत्रपती संभाजी महाराज समाधीचे सर्व उपस्थित सदस्यांनी दर्शन घेऊन,व सोमनाथ गोडसे, कोकाटे सर यांनी छत्रपती संभाजी राजांची संघर्ष गाथा यावर व्याख्यान करून ३७ वा ट्रेक गिरीप्रेमींनी समाधी स्थळी उत्साहात साजरा केला.
या कार्यक्रमास असंख्य गिरीप्रेमी सदस्य उपस्थित होते त्यामध्ये प्रामुख्याने गणेश बापू माने देशमुख (चेअरमन, जयहिंद शुगर),संतोष महांगडे उद्योजक गणेश दहिभाते (अध्यक्ष संभाजी ब्रिगेड,पुणे जिल्हा), सतीश काळे (अध्यक्ष, पिंपरी चिंचवड शहर), इंद्रजित पाटील, राहुल कांबळे, प्रशांत लेणे,प्रमुख मार्गदर्शक डॉ श्रीमंत कोकाटे, संयोजक रविदादा ढमढेरे, महेश शिंदे, लहू आण्णा लांडगे, सतीश पाबळे, राहुल धनकुडे, रमेश बांडे विनोद गलांडे, बाळासाहेब बेंद्रे, दिलीप शितोळ, जलिंदर कातकडे, चंद्रकांत पाटील, भानुदास रानवडे माजी सरपंच गणपतराव काळकुटे, लक्ष्मण भंडारे, समीर ढमढेरे, दिलीप पुणेकर,भाऊ अल्हाट, सोमनाथ गोडसे, औदुंबर लोंढे, मावळ कृषी अधिकारी नवीन चंद्र बोऱ्हाडे, खेड कृषी अधिकारी प्रवीण शिंदे, अरविंद काका चौधरी, राजू जगताप, शिवव्याख्याते शेखर पाटील सह तुळापूर गावचे सरपंच, उपसरपंच, आजी-माजी पदाधिकारी ग्रा. सदस्य रुपेश शिवले, लोचन शिवले आदींसह समस्त ग्रामस्थ या कार्यक्रमास उपस्थित होते.
सर्व गिरीप्रेमींनी प्रथम वढू बुद्रुक येथे व तुळापूर येथे श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन जोरजोरात घोषणा देऊन नामस्मरण करून समाधी परिसर दुमदुमून टाकला या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार समारंभ झाला व त्यानंतर सोमनाथ गोडसे, व कोकाटे सर यांनी श्री छत्रपती संभाजी राजांची संघर्ष गाथा यावर व्याख्यान सांगितले. या ट्रेक पाच वर्ष पूर्ण झाली या कार्यक्रमाची सांगता झाल्यावर देशमुख पेट्रोलियम चे मालक प्रमोद आप्पा देशमुख यांनी सर्व गिरिप्रेमी सदस्यांना मासवडीचे महाभोजनाचे नियोजन केले तसेच औदुंबर लोंढे, जिल्हा विशेष लेखा परीक्षक बाळासाहेब बेंद्रे, गणेश बापू माने यांनी मनोगत व्यक्त केले. व रमेश बांडे यांनी प्रस्तावना व सूत्रसंचालन केले.तर वाडेबोल्हाईचे माजी सरपंच महेश शिंदे यांनी आभार मानले. व कार्यक्रमाची सांगता झाली.