प्रतिनिधी लोणीकंद
लोणीकंद ता.हवेली जिल्हा पुणे येथील डॉ.बसू विद्या-धाम हायस्कूल शाळेत डॉ.बसू यांच्या प्रतिमेचे पूजन समाजसुधारक उत्तमराव भोंडवे यांनी केले या कार्यक्रमाची प्रस्तावना शाळेचे मुख्याध्यापक ब्राह्मणी सरांनी केली. तर अध्यक्ष उद्योजक मारुती भूमकर होते सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमप्रसंगी समाजसुधारक उत्तमराव भोंडवे, उद्योजक मारुती भूमकर, भाऊसाहेब होले, मा.उपसरपंच श्रीमंत झुरूंगे मा. आदर्श सरपंच अनिल होले, मा.ग्रा.सदस्य रघुनाथ तापकीर, हभप गुलाबराव कंद, उपसरपंच राहुल शिंदे, ग्रा. सदस्य गौरव झुरूंगे, सामाजिक कार्यकर्ते बुधाराम कंद, रवींद्र कंद, सोपान कंद, नवनाथ कंद, सचिन विधाटे, शाळेचे मुख्याध्यापक ब्राह्मणे सर, दीक्षित सर, शिक्षकवृंद व शाळेचे विद्यार्थी आदींसह लोणीकंदचे ग्रामस्थ उपस्थितीत होते.
या कार्यक्रमात उद्योजक मारुती भूमकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्र्यावर आपले मनोगत व्यक्त केले.तर उपसरपंच राहुल शिंदे यांनी यापुढील काळात शाळेला काही मदत लागल्यास ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तसेच पीडीसीसी बँकेचे संचालक प्रदीपदादा कंद यांच्या माध्यमातून मदत करणार असल्याचे आश्वासन दिले. व ग्रा. सदस्य गौरव झुरुंगे यांनी डॉ.बसू यांच्या संपूर्ण जीवन चरित्र विषयीची माहिती विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना आपल्या भाषणातून सांगितली. डॉ. बसू हे मूळचे पश्चिम बंगालचे त्यांचा जन्म दि.२३/०९/१८८६ ला पश्चिम बंगाल मध्ये झाला. बालपण हे पश्चिम बंगालमध्ये गेले शिक्षणानंतर ते भारतीय सैन्यात कर्नल म्हणून नियुक्त झाले नोकरी मुळे ते भारत भर फिरू लागले त्यांच्या नोकरीचा शेवट हा पुण्यात गेला. निवृत्त झाल्यावर ते पुण्यातच स्थायिक झाले त्यांना सामाजिक कार्याची आवड असल्याने ते “पुणे रोटरी क्लब” या सामाजिक संस्थेशी जोडले गेले या संस्थेच्या माध्यमातून पुणे ग्रामीण भागात सामाजिक कार्य करू लागले त्यामुळे त्यांचा संबंध लोणीकंद गावाशी आला गावातील खूप समस्यांमुळे “पुणे रोटरी क्लब” ने हे गाव दत्तक घेतले. अनेक समस्या त्यांच्या लक्षात आल्या त्यातील प्रमुख समस्या होती ती शिक्षणाची येथील मुलांना शिक्षण घेण्यासाठी पुण्यात जावे लागत होते पुणे रोटरी क्लबच्या माध्यमातून त्यांनी शाळेची स्थापना करून शाळा सुरू केली. असे भाषणात गौरव झुरुंगे यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर गायकवाड सरांनी केले व सर्वांचे आभार निखिल शिंदे सरांनी मानले.