पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघावर कमळ फुलणार, भाजपची रणनीति ठरली : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पाश्वभूमीवर भाजपने कंबर कसली असून त्याची जोरदार तयारी देखील सुरू केली आहे. मंत्रिपदाची अपेक्षा न ठेवता आता लोकसभा निवडणुकांच्या तयारीला लागा असे आदेश भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी राज्यातील नेत्यांना दिले आहेत.

 

लोकसभेच्या सर्व जागा निवडून आणायच्या आहेत. लोकसभेच्या ४८ जागा पैकी ४५ पेक्षा जास्त जागा जिंकायच्या आहेत. असे भाजपच्या नेत्यांना सांगण्यात आले आहेत.आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि शहाराध्यक्ष धीरज घाटे यांनी पुण्यासाठी भाजपची जॅम्बो कार्यकारिणी जाहीर केलीय. यातच आता बावनकुळेंच्या उपस्थितीत पुण्याच्या कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली. यामध्ये नरेंद्र मोदींच्या देशसेवेत हातभार लावण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे. या संधीचं सोनं करा.

आजपासूनच पुणे महानगरपालिकेच्या वतीने निवडणुकीच्या तयारीला लागा. पुणे जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघ आपल्याला जिंकायचे आहेत. त्यामुळे आजपासून कामाला लागा अशा सूचना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुण्यातील नवनिर्वाचित कार्यकारीणीच्या बैठकीत दिल्या.

दरम्यान, अजित पवार सत्तेत सामील झाल्यामुळे पुण्यातील राजकीय गणित देखील बदललं आहे. यातच पुण्याच्या महापालिकेवर भाजपची सत्ता होती. महापालिकेवर सत्ता स्थापित करण्यासाठी भाजपलं काॅंग्रेसचं मोठं आवाहन असणार आहे. कारण कसबा पेठ पोटनिवडणुकीत काॅंग्रेसने भाजपचा दारूण पराभव केला. त्यामुळे याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें