हडपसर येथे सोसायट्यासाठी तंटामुक्ती समितीच्या कार्यशाळेप्रसंगी नगरसेवक योगेश ससाणे यांचा सत्कार करताना मान्यवर (छाया :संदिप डोके हडपसर)
हडपसर दि.१९(प्रतिनिधी संदिप डोके)
गावागावामध्ये तंटामुक्ती समिती आहे, त्याच पद्धतीने गृहनिर्माण सोसायट्यांमध्येसुद्धा तंटामुक्ती समितीची गरज आहे. सोसायट्यांमध्ये तंटामुक्ती समिती स्थापन करण्यासाठीचा निर्णय शासन दरबारी घेण्यात येणार असल्याची माहिती शहर जिल्हा उपनिबंधक संजय राऊत यांनी दिली.
हडपसरमध्ये महाराष्ट्र शासन सहकार विभाग, सावली फाउंडेशन आणि सप्तसिध्दी असोसिएट यांच्या संयुक्त विद्यमाने डिम्ड कन्व्हेन्स आणि री डेव्हलपमेंटविषयी कार्यशाळेचे आयोजन केले होते. याप्रसंगी कार्यशाळेत ग्रामीण जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप, आर्किटेक अतीत अदमुलवार, विधीतज्ज्ञ अनिल तांबे, संजय ससाणे, वैभव माने यांच्यासह 208 सोसायट्यांचे सभासद उपस्थित होते. यावेळी वर्धमान टाऊनशिप, निर्मल टाऊनशिप, गांगा व्हीलेज, फोश सहकारी सोसायटीचे सभासदांनी कॉन्व्हेस्ट डीड व री डेव्हलपमेंटविषयीच्या समस्या विचारल्या. त्यावर जिल्हा उपनिबंधक संजय राऊत म्हणाले की, कन्व्हेस्ट डीम्ड करण्याकरिता सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार विभागासोबत संपर्क साधावा. त्यासोबत जुन्या मोडकळीस आलेल्या सोसायटी ने कागदपत्रे परिपूर्ण असल्यास स्वतः री डेव्हलपमेंट चा निर्णय घेऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. माजी नगरसेवक आणि सावली फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष योगेश ससाणे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रथमेश ससाणे यांनी आभार मानले.