लोणीकंद प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील हवेलीतील पूर्व भागातील पेरणे गाव येथे विविध विकास कामांचा उद्घाटन सोहळा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, व पीडीसीसी बँकचे विधमान संचालक प्रदीपदादा कंद, भाजपा राज्य क्रिडा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संदिप भोंडवे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख अनिल काशीद, भाजपा हवेली तालुकाध्यक्ष शामराव गावडे, माजी उपसभापती ज्ञानेश्वर वाळके, शिवसेना हवेली तालुकाप्रमुख विपुल शितोळे, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष संदिप सातव, अलंकार कांचन, गणेश सातव, जिल्हा सचिव प्रदिप सातव, महिला मोर्चा अध्यक्षा पुनम चौधरी, सुप्रिया गोते, पंचायत राजचे जिल्हा उपाध्यक्ष शरद आव्हाळे, संपर्क प्रमुख प्रशांत कोतवाल, तालुका सरचिटणीस गणेश चोधरी, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस साईनाथ वाळके पाटील, माधुरी वाळके, सरपंच उषा वाळके, उपसरपंच गणेश येवले आदी उपस्थित होते.याप्रसंगी माजी उपसरपंच शरद माने तसेच दशरथ वाळके यांनी स्वागत करुन पेरणे गावच्या समस्या व मागण्या मांडल्या. व माजी उपसरपंच शिवाजीनाना वाळके यांनी सुत्रसंचालन केले.
कार्यक्रमादरम्यान शिवसेना भाजपासह महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी पेरणे, डोंगरगाव, बुर्केगाव, पिंपरी सांडस, न्हावी सांडस, अष्टापूर तसेच गावडेवाडी, वाडेबोल्हाई या गावात जनसंवाद दौरा केला. व या परिसरातील न्हावी सांडस येथे पंतप्रधान आवास योजना,लोणीकंद ते पेरणे डोंगरगाव रस्ता तसेच येवले वस्ती ते बकोरी रस्ता अशा सुमारे १० कोटी ५० लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांची उद्धाटने,व भुमीपुजन केली.
पुर्व हवेलीच्या सर्वांगिण विकासासाठी आजवर भरीव निधी दिला असून यापुढील विकासाकरीताही सदैव तत्पर व प्रयत्नशिल राहणार असल्याचे व कंद यांच्या शिरुर हवेलीतील कार्याचे कौतुक करुन कंद यांनी या मतदार संघाचे सक्षमपणे नेतृत्व करावे, अशी अपेक्षा शिरुर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व्यक्त केली. तर पेरणे परिसराला आजवर १५ कोटींचा निधी दिला असून पंतप्रधान मोदीजीच्या संकल्पनेतील २७ कोटींच्या नव्या जलजीवन मिशन योजनेमुळे पाण्याचाही प्नश्न कायमचा सुटणार आहे. पेरणे गावचे उर्वरित प्रश्न सोडवू तसेच शिवाजी पुतळा चौक सुशोभिकरण करणे तसेच छत्रपती शंभुराजांच्या ऐतिहासिक स्मारकासाठी श्रीक्षेत्र वढु – तुळापूरसाठी ४०० कोटींचा विकास आराखडा मंजुरी, हिंगणगाव खामगाव टेक पुलासाठी २५ कोटीं तर तुळापूर-भावडी रस्त्यासाठी १० कोटीचा निधी, यासह विविध विकासकामे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठबळामुळे मार्गी लावता आल्याचे समाधान असल्याचेही त्यांनी नमूद केले.सरकारची योजना प्रत्येक नागरिका पर्यंत पोहोचली पाहिजेत. घरकुल योजनेचा शुभारंभ केंद्र सरकारकडून अडीच लाख रुपयाची, पाण्याची योजना जलमिशन प्रत्येक गावामध्ये कोट्यावधींची योजना चालू झाली आहे.तसेच रस्त्यांची योजना,महिलांसाठी योजना, मोदींचे स्वप्न घराघरात नळ बसला पाहिजे. यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. असे जिल्हा बँकेचे संचालक व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीपदादा कंद यांनी “शिरूर हवेली न्यूज” शी बोलताना सांगितले.