लोणीकंद प्रतिनिधी
हवेली तालुक्यातील लोणीकंद (पाटीलवस्ती) येथील “सुखकर्ता युवा प्रतिष्ठान” मंडळाच्या गणेशोत्सवाचे यंदा १९ वे वर्ष आहे दरवर्षीप्रमाणे यंदाचा गणेशोत्सव विविध कार्यक्रम आयोजित करून साजरा होणार आहे.
श्रीगणेश चतुर्थीला म्हणजे मंगळवारी (ता. १९) रोजी सकाळी दहा वाजता लोणीकंद म्हसोबा मंदिर ते पाटील वस्ती गणरायाची आगमनाची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे आकर्षक सजवलेल्या रथात , तसेच (रूबाब ढोल पथक) यांच्या वाद्यढोल-ताशांच्या गजरात गणरायाची मिरवणूक काढण्यात येणार आहे.नंतर दुपारी १.०० वाजता गणरायाच्या प्रतिष्ठापनेला सुरुवात होणार आहे. विविध मान्यवरांच्या हस्ते श्रीगणेशाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. प्रसिद्ध साऊंड सिस्टिम,मनमोहक रोषणाई हे देखाव्यासह दररोजचे विविध ठेवलेले कार्यक्रम या गणेत्सोवाचे मुख्य आकर्षण आहे.
सदर गणेशोत्सव कार्यक्रमची रूपरेषा खालील प्रमाणे दि. २२/९/२३ रोजी लहान मुले, मुली, महिला भगिनी, तरुण वर्ग यांच्यासाठी संगीत खुर्चीचे आयोजन केले आहे दि. २३/९/२३ रोजी शिवव्याख्याते श्री शेखर पाटील यांचे शिवशाहीचा महापराक्रमी वारस या विषयावर शिवचरित्र व्याख्यान होणार आहे. दि. २४/९/२३ रोजी लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम व नृत्य स्पर्धा आहेत दि. २५/९/२३ रोजी महिलांसाठी सुप्रसिद्ध असा होम मिनिस्टरचा खास कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. व बक्षीस वितरण आहे. दि. २६/९/२३ रोजी सर्वांच्या करमणूकीसाठी भुजंग जादूगर यांचा कार्यक्रम आहे. दि.२७/९/२३ रोजी सत्यनारायणची महापूजा व महाप्रसादाचे नियोजन केले आहे. तरी या कार्यक्रमासाठी परिसरातील व लोणीकंद मधील सरपंच, उपसरपंच, ग्रा. सदस्य, आजी-माजी पदाधिकारी, महिला भगिनी, मंडळाचे सर्व कार्यकर्ते, आदींसह बहुसंख्य नागरिक,ग्रामस्थ उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अशी माहिती मंडळाचे मा.अध्यक्ष सुयोग कंद यांनी “शिरूर हवेली न्यूज”शी बोलताना सांगितले.