लोणीकंद प्रतिनिधी
शिरूर तालुक्यातील वढू बु येथील माहेर संस्था अनाथालयातील मुलांना फळ व खाऊ वाटप करून केशव सिताराम ठाकरे ( प्रबोधनकार ठाकरे ) यांची जयंती लोक प्रबोधन दिन म्हणून संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्याच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेला हार घालून प्रतिमेची पुजा केली.
त्याप्रसंगी जिल्हा सचिव निलेश ढगे, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष नवनाथ जाधव, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मोहिनी रणदिवे, शिरूर तालुकाध्यक्ष अक्षय गायकवाड, हवेली तालुकाध्यक्ष शिवाजी पवार, जिल्हा उपाध्यक्ष निलेश कांबळे, लक्ष्मीपुत्र सरपंच, जुन्नर पुर्व तालुकाध्यक्ष राजाराम गाजरे, व माहेर संस्थेतील व्यवस्थापक व मोठ्या संख्येने विद्यार्थी मुलं -मुली उपस्थित होते,
प्रत्येक वर्षी संभाजी ब्रिगेडच्या वतीने केशव सिताराम ठाकरे यांची जयंती साजरी केली जाते तसेच संस्थेतील उपस्थित मुलांना संभाजी ब्रिगेड पदाधिकाऱ्यांच्या हस्ते फळ व खाऊ वाटप करण्यात आले. तसेच येथील उपस्थित मुलांना प्रबोधनकार ठाकरे यांचे कार्य व त्यांनी समाजामध्ये प्रबोधन करून केलेली जनजागृती या विषयी माहिती जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी दिली तर जुन्नर तालुका पुर्व तालुकाध्यक्ष राजाराम गाजरे यांनी आभार मानले व माहेर संस्थेतील व्यवस्थापकांनी संभाजी ब्रिगेड च्या कार्याचे कौतुक करून पदाधिकाऱ्यांचे आभार मानले,