शालेय जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत पै.निरंजन किरण शिंदेने मिळविले गोल्ड बक्षीस 

 

 लोणीकंद प्रतिनिधी 

पुणे : त्रिमूर्ती नगर ता. नेवासा जि.अहमदनगर येथे झालेल्या जिल्हा क्रीडा कार्यालय, अहमदनगर व त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित,दादासाहेब हरिभाऊ घाडगे पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत पै.निरंजन किरण शिंदे याने गोल्ड बक्षीस मिळवून रेणुका माता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळगाव पिसा व लोणीकंद मधील जाणता राजा कुस्ती केंद्राचे नाव उज्वल केले.

पै.निरंजनने उत्तुंग यश संपादन केल्याबद्दल सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.तसेच पुणे जिल्हा परिषद मा.अध्यक्ष व पी.डी.सी.सी.बँकेचे विघमान संचालक प्रदीप कंद , महाराष्ट्र क्रीडा आघाडी अध्यक्ष संदीप भोंडवे, लोणीकंद ग्रा. माजी आदर्श सरपंच श्रीकांत कंद, चिंचणी ग्रा. माजी सरपंच दादासाहेब पवार, निळोबा कंद,राजेंद्र कोळपे, भानुदास कोळपे, रमेश लोखंडे, बबनराव कोळपे, निलेश भागवत, आदींसह  लोणीकंद ग्रामस्थांनी पै.निरंजनचे कौतुक करून अभिनंदन केले.

या यशासाठी रेणुका माता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळगाव पिसा येथील शिक्षकवृंद व जानता राजा कुस्ती केंद्र लोणीकंदचे संस्थापक संदीप भोंडवे व महिपतीसर कोच यांनी या स्पर्धेसाठी मार्गदर्शन केले व सराव करून घेतला.चे संतोष काळे यांनी “शिरूर हवेली न्यूज” शी बोलताना सांगितले.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें