हडपसर दि.१४(प्रतिनिधी संदिप डोके)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्याध्यक्ष व्यापारी सेल पदावर नुकतीच श्री विकास रामबिलास मुंदडा यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना निवडीचे पत्र पुणे शहराचे अध्यक्ष दीपक मानकर यांच्या हस्ते देण्यात आले.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली व पुणे शहराचे अध्यक्ष दीपक माधवराव मानकर यांच्या नेतृत्वाखाली मी पक्ष वाढीसाठी तसेच व्यापाऱ्यांच्या हितासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे मत नवनियुक्त कार्याध्यक्ष विकास शेठ मुंदडा यांनी व्यक्त केले.पुणे शहरात व्यापाऱ्यांच्या माध्यमातून सहकार तसेच सामाजिक क्षेत्रात देखील चांगली कामगिरी करणार आहे.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल भाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या मान्यतेने आपल्या पक्षांची विचारधारा व तत्त्वांना केंद्रस्थानी ठेवून पक्षाचा विस्तार व संघटन वाढवण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करणार असून जनसामान्यांच्या मनात आपल्या पक्षाची प्रतिमा अधिक उज्वल करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास या निमित्ताने सर्वांना देतो असे मत यावेळी विकास मुंदडा यांनी व्यक्त केले.विकास मुंदडा यांच्या निवडीबद्दल परिसरातील सर्व नागरिकांनी, मित्र परिवारांनी, व्यापारी वर्गांनी त्यांचा सत्कार केला .