हडपसर दि.१४(प्रतिनिधी)
श्रीमुक्तादेवी विद्यालय नारोडी येथे शालेय व्यवस्थापन समिती,स्कुल कमिटी, विकास समिती सभांचे आयोजन करण्यात आले होते.सुरूवातीला मुख्याध्यापक रोहिदास साळी सर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले , सभेचे अध्यक्ष स्थान शिवाजी पिंगळे सर यांनी भूषविले.सुरुवातीला मागील सभा अहवाल वाचन प्रमोद चपटे सर यांनी वाचन करून त्यावर चर्चा करण्यात आली.सभेमध्ये विद्यार्थ्यांच्या शालेय गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यासंदर्भात तसेच कर्मवीर जयंती सोहळा कार्यक्रमाबाबत चर्चा झाली यांमध्ये नवनाथ हुले स्कुल कमिटी सदस्य, रोहिदास साळी मुख्याध्यापक,सुभाष हुले सर, सोपान हुले सर, गणेश वाघमारे, संदिप हुले, प्रमोद पिंगळे, राजेंद्र वाघ मारे,व इतर सदस्यांनी भाग घेतला.सभेला स्कुल कमिटी सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती, विकास समिती सदस्य उपस्थित होते.सर्व उपस्थितांचे आभार भगवान भोर सर यांनी मानले व सभेची सांगता झाली.