वाघोलीत भांड्याचे दुकान फोडणारे चोरटे जेरबंद – रोख रक्कम व चोरीची रिक्षा जप्त

वाघोली: प्रियंकानगरी, वाघोली येथे असलेल्या ‘श्री कृष्णा मेटल्स’ या भांड्याच्या दुकानात चोरी करून फरार झालेल्या तिघा आरोपींना वाघोली पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत अटक करून मोठे यश मिळवले आहे. आरोपींकडून एकूण ₹५९,०१०/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, यामध्ये चोरीस गेलेली रोख रक्कम व रिक्षा समाविष्ट आहे.

दि. ३१ जुलै २०२५ रोजी रात्री २ वाजता दुकानाचे शटर उचकटून व तोडून अनोळखी चोरट्यांनी रोख रक्कम चोरली व घटनास्थळावरून रिक्षाद्वारे फरार झाले होते. याप्रकरणी संबंधित दुकानदाराने वाघोली पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासदरम्यान पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा इंगळे व पोलीस अंमलदार समीर भोरडे, प्रविण केदार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार विशेष पथकाने आरोपींचा शोध घेतला. यामध्ये खालील आरोपींचा समावेश आहे: अनिकेत अविनाश इंगळे (वय २१), रा. बिरादारनगर, हडपसर, साहिल रोशन शेख (वय २०), रा. बिरादारनगर, हडपसर, विधीसंघर्षी बालक – त्याची ओळख कायदेशीर कारणास्तव गोपनीय ठेवण्यात आली आहे.

चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांनी वापरलेली रिक्षा हडपसर परिसरातून चोरी केली होती, हेही निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली रिक्षा व चोरीस गेलेली रोख रक्कम मिळून एकूण ₹५९,०१०/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या कारवाईसाठी पुणे शहराचे अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त सोमय मुंडे, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे, पोनि आसाराम शेटे, पोउपनि मनोज बागल, उपनिरीक्षक सुवर्णा इंगळे आणि पोलीस कर्मचारी बाबासाहेब मोराळे, ठोंबरे, प्रदीप मोटे, मंगेश जाधव, सुनिल कुसाळकर, समीर भोरडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, दीपक कोकरे, साईनाथ रोकडे, प्रितम वाघ, शिवाजी चव्हाण, प्रविण केदार यांनी ही कामगिरी केली.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें