सणसवाडी-कोरेगाव गटात पूर्वसर्वेक्षणात्मक मतचाचणी सर्वेक्षणात अमित सोनवणे दुसऱ्या क्रमांकावर  

शिरूर – आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सणसवाडी-कोरेगाव गटातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.  सुरू असलेल्या पूर्व सर्वेक्षणात्मक ऑनलाइन सर्वेक्षणात भाजपा पुणे जिल्हा सरचिटणीस अमित सोनवणे यांनी २७.८५% मते मिळवत दुसऱ्या क्रमांकावर स्थान पटकावले असून, त्यांनी स्थानिक जनतेच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केल्याचे स्पष्ट झाले आहे.

या सर्वेक्षणात एकूण १२७६ मतदारांनी सहभाग घेतला असून, १३५० मते नोंदवली गेली आहेत. यामध्ये जयेश शिंदे (३५.२६%) हे आघाडीवर असले, तरी अमित सोनवणे यांचा पाठपुरावा उल्लेखनीय आहे. त्यांना मिळालेली ३७६ मते ही त्यांच्या सामाजिक कार्याची आणि संपर्कक्षमता यांची पोचपावती मानली जात आहे.

अमित सोनवणे हे गेल्या काही वर्षांपासून परिसरात सामाजिक, शैक्षणिक आणि ग्रामीण विकासाच्या कामात सक्रिय आहेत. ग्रामविकास, महिला सक्षमीकरण, जलसंधारण अशा विविध उपक्रमांमधून त्यांनी नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. विशेषतः युवक आणि महिला वर्गात त्यांच्याविषयी विशेष आकर्षण पाहायला मिळत आहे.

सोनवणे यांची भाषाशैली, साधेपणा आणि सर्वसामान्यांसाठी सतत उपलब्ध असण्याची वृत्ती यामुळे त्यांना उपाधी लाभली आहे. त्यांच्या संपर्कात राहणाऱ्यांना ते केवळ राजकीय प्रतिनिधी नसून, कुटुंबातील सदस्यासारखे वाटतात, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे

सध्या सर्वेक्षणात भाजपा शिरूर तालुकाध्यक्ष जयेश शिंदे आघाडीवर असले तरी, अमित सोनवणे यांचे मताधिक्य झपाट्याने वाढत असून, अंतिम टप्प्यात त्यांनी आघाडी घेतल्यास आश्चर्य वाटणार नाही. प्रचार आणि जनसंपर्क मोहीम अधिक तीव्र केल्यास, पूर्वसर्वेक्षणात्मकचा निकाल हा केवळ प्राथमिक कल असल्याने अंतिम निर्णय जनतेच्या मतपेटीतूनच होणार आहे.

मात्र, सोनवणे यांची वाढती लोकप्रियता आणि त्यांची जमिनीवरची ताकद पाहता, सणसवाडी-कोरेगाव जिल्हा परिषद गटात निवडणूक अत्यंत रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें