तरुण नेतृत्वाच्या दिशेने ओंकार कंद यांची दमदार वाटचाल  

लोणीकंद, (प्रतिनिधी) :पुणे जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोणीकंद पंचायत समिती गणातून ओंकार हनुमंत कंद यांचे नाव इच्छुक उमेदवारांमध्ये ठळकपणे समोर येत आहे. सामाजिक क्षेत्रात सातत्याने सक्रिय असलेले ओंकार कंद हे तरुणांचे प्रभावी नेतृत्व ठरत असून, अनेकांसाठी ते प्रेरणास्थान बनले आहेत.

सोमेश्वर पतसंस्थेचे चेअरमन संजय सोपान कंद यांनी ओंकार कंद यांच्या कार्यशैलीचे कौतुक करताना म्हटले, “ओंकार कंद हे तरुणांमध्ये जनसंपर्क, सामाजिक बांधिलकी आणि नेतृत्वगुण यांचा आदर्श प्रस्तुत करत आहेत. त्यांनी स्थानिक प्रश्नांवर सातत्याने भूमिका घेतली असून, त्यांच्या कार्याची दिशा सकारात्मक आहे.”

लोणीकंद पंचायत समिती गणात निरगुडी, वडगाव शिंदे, भावडी, तुळापुर, फुलगाव, लोणीकंद, वढू खुर्द ही गावे समाविष्ट असून, या भागातील मतदारांमध्येही ओंकार कंद यांच्याविषयी सकारात्मक वातावरण असल्याचे चित्र दिसून येत आहे.

भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा कंद यांचे तसेच सोमेश्वर पतसंस्थेचे चेअरमन संजय कंद, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शंकर भूमकर, भाजपा क्रीडा आघाडीचे अध्यक्ष संदीप भोंडवे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रविंद्र कंद, माजी सरपंच श्रीकांत कंद यांचे मार्गदर्शन लाभत असल्यामुळे ओंकार कंद यांचे सामाजिक कार्य अधिक प्रभावीपणे पुढे जात आहे.

स्थानिक पातळीवर विविध विकासकामे, तरुणांसाठी उपक्रम, महिला सक्षमीकरण, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात त्यांनी आपली ठसा उमटवला आहे. त्यामुळे लोणीकंद पंचायत समिती गणासाठी एक सक्षम, तरुण आणि समर्पित नेतृत्व म्हणून ओंकार कंद यांच्याकडे पाहिले जात आहे.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें