चंद्रकांत वारघडे यांचे पर्यावरणपूरक कार्य प्रेरणादायी – माजी आमदार अशोक पवार  

बकोरी (ता. हवेली) पर्यावरण रक्षणासाठी सामाजिक सहभागातून नवा आदर्श प्रस्थापित करत माहिती सेवा समिती आणि दादाजी वारघडे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने बकोरी येथील वनराई-देवराई प्रकल्पात १ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प हाती घेण्यात आला आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे नेतृत्व चंद्रकांत वारघडे करीत असून, दररोज विविध मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपणाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. यामुळे समाजात हरित क्रांतीचा सकारात्मक संदेश पोहोचत आहे.

या उपक्रमाला पाठिंबा दर्शवण्यासाठी शिरूर हवेलीचे माजी आमदार अशोक पवार यांनी नुकतीच बकोरी येथे भेट दिली. त्यांनी स्वतः वृक्षारोपण करून चंद्रकांत वारघडे यांच्या कार्याचे खुलेमनाने कौतुक केले.

वारघडे यांचे कार्य केवळ वृक्ष लागवडीपुरते मर्यादित नाही, तर भावी पिढ्यांसाठी हिरव्या महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे आहे. त्यांच्या उपक्रमात प्रत्येकाने सक्रिय सहभाग घ्यावा, हीच आजची गरज आहे, असे मत पवार यांनी व्यक्त केले.

वनराई प्रकल्पात विविध प्रजातींची झाडे लावण्यात आली असून, त्यामुळे परिसरातील जैवविविधतेत लक्षणीय वाढ झाली आहे. आज या परिसरात हजारो पक्ष्यांचे वास्तव्य असून, विविध फुलाफळांच्या झाडांचा सुगंध परिसरात दरवळत आहे. परिणामी वातावरण अधिकच निसर्गमय आणि प्रसन्न झाले आहे.

चंद्रकांत वारघडे यांचा हा उपक्रम केवळ वृक्षारोपणपुरता मर्यादित नसून, निसर्गाशी नाळ जोडणारी एक सामाजिक चळवळ ठरली आहे. पर्यावरण रक्षणाच्या दिशेने त्यांनी स्वीकारलेले दीर्घकालीन दायित्व संपूर्ण समाजासाठी एक प्रेरणास्त्रोत ठरत आहे.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें