लोणीकंद: न्यू टाइम्स इंटरनॅशनल स्कूलच्या दिंडी व पालखी सोहळ्यातून वारकरी संप्रदायाचा संदेश  

लोणीकंद, ता. हवेली : न्यू टाइम्स इंटरनॅशनल स्कूल, लोणीकंद यांच्या वतीने आयोजित विद्यार्थ्यांची दिंडी व पालखी सोहळा गावाच्या प्रदक्षिणेनंतर ग्रामपंचायत चौकातील मारुती मंदिरात मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला. या दिंडीद्वारे विद्यार्थ्यांनी हिंदू धर्मसंस्कृती, वारकरी संप्रदायाचे महत्त्व आणि सामाजिक ऐक्याचा संदेश दिला.

शाळेचे संस्थापक मारुती भुमकर यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तीमय पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सांस्कृतिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भक्तिभाव, शिस्त आणि संस्कृती यांचे बीजारोपण होत असून, भावी पिढीला पारंपरिक मूल्यांची जाणीव करून देण्याचा स्तुत्य प्रयत्न शाळेकडून करण्यात आला. या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत टाळ-मृदंगाच्या गजरात अभंगगायन सादर करत “पंढरीच्या” जयघोषांनी संपूर्ण परिसर भक्तिमय केला. शाळेच्या आवारात वारीचा अनुभव देणारा आनंददायी वातावरण निर्माण झाला होता.

कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नारायणराव कंद, श्रीमंत झुरुंगे, श्रीकांत कंद, रघुनाथ तापकीर, सोपान कंद, बाजीराव कंद, विठ्ठल शिंदे, गजानन कंद, शहाजी शिंदे, सरपंच मोनिका कंद, उपसरपंच सुजाता कंद, ग्रा. सदस्य यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी, शाळेचे शिक्षक, पालक व विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. विद्यार्थ्यांच्या या सहभागामुळे भक्ती, संस्कार व सामाजिक एकात्मतेचा संदेश प्रसारित झाला.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें