खोट्या लग्नांच्या आमिषाने युवकांची फसवणूक करणारी टोळी जेरबंद

नारायणगाव पोलिसांची कारवाई; आरोपींकडून २५ हजारांची रोकड जप्त

नारायणगाव, ता. जुन्नर : खोट्या लग्नांचे आमिष दाखवून अविवाहित तरुणांकडून लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत नारायणगाव पोलिसांनी आठ आरोपींना ताब्यात घेतले आहे. या आरोपींनी पुणे, बुलढाणा, नगर जिल्ह्यातील अनेक युवकांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, आरोपींकडून २५ हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

खोडद (ता. जुन्नर) येथील शरद तुकाराम गायकवाड यांनी नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून भारतीय दंड विधान कलम ३१८(४), ३१६(२), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी खालील आरोपींना अटक केली आहे:

१) सुवर्णमाला सुरेश वाडकर (छ. संभाजीनगर)

२) मनीषा अडसुळे (सिंहगड रोड, पुणे)

३) संतोष सखाराम घोडे (पिंपळनेर, जि. बुलढाणा)

४) भारती दामोदर मोरे (डोणगाव, जि. बुलढाणा)

५) अश्विनी सागर जगदाळे (पर्वती दर्शन, पुणे)

६) सुनील काळे (पंचतळे, शिरूर)

७) पंकज डग (पंचतळे, शिरूर)

८) नामदेव कोल्हे (जांबुत, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर)

गुन्ह्यातील प्रमुख महिला आरोपी अश्विनी जगदाळे हिच्या नावावर आधीच सहा ते सात खोट्या लग्नांचे प्रकार आढळले असून, तिचे १६ वर्षांची मुलगी व १४ वर्षांचा मुलगा असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी महिला व पुरुष हे ‘मॅरेज ब्रोकर’च्या भूमिकेतून युवकांना विवाहाचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळत होते.

तपासादरम्यान ओतूर पोलीस ठाण्यातही याच आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याचे समोर आले आहे. आरोपींनी जुन्नर, पारनेर, शिरूर भागातही अशाच प्रकारचे गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. सदर गुन्ह्यातील चार आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत, तर तीन आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एक आरोपी फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.

या कारवाईसाठी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मा. संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी (जुन्नर) रवींद्र चौधर, नारायणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगदेवाप्पा पाटील तपास करत आहेत. या घटनेमुळे युवकांमध्ये खळबळ उडाली असून, अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें