वाघोलीच्या राजकारणात मोठा भडका! डॉ. पवन सोनवणे यांच्या एंट्रीनं वातावरण तापणार  

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्या चेहऱ्याच्या एंट्रीनं खळबळ – प्रस्थापितांना मोठं आव्हान

वाघोली: आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाघोलीचा राजकीय पारा चढलेला असतानाच एका नव्या, तेजस्वी चेहऱ्याच्या प्रवेशाने वातावरण अक्षरशः पेटले आहे. वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे आणि सामाजिक भान असलेले डॉ. पवन सोनवणे हे निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठा भडका उडण्याची चिन्हं दिसत आहेत.

हा चेहरा अभ्यासू, सुशिक्षित, कार्यक्षम आणि लोकाभिमुख आहे. अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या वाघोली प्रभागातून डॉ. सोनवणे यांच्या उमेदवारीची शक्यता बळावत चालली असून, त्यांच्या संपर्क मोहिमेला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

आरोग्य उपक्रम, मोफत तपासणी शिबिरे, ग्रामीण भागातील सेवा, समाजप्रबोधन यामुळे डॉ. पवन सोनवणे यांनी स्थानिकांमध्ये ठोस विश्वास निर्माण केला आहे. वैद्यकीय सेवेशी एकनिष्ठ राहून समाजाच्या दुखऱ्या अंगावर फुंकर घालणाऱ्या या डॉक्टरकडे आता लोक प्रतिनिधित्वाचीही अपेक्षा व्यक्त होत आहे. डॉ. सोनवणे यांची शांत पण प्रभावी उपस्थिती, सजग जनसंपर्क आणि प्रामाणिक प्रतिमा यामुळे वाघोल गोटात जोरदार हालचाली सुरू झाल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.

राजकीय आखाड्यात डॉ. पवन सोनवणे यांच्या नावाची अधिकृत घोषणा कधी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सध्या तरी त्यांच्या नावाच्या चर्चेने वाघोलीचं वातावरण पूर्णपणे तापलं असून, ‘हा चेहरा खरोखरीच बदल घडवतो का?’ याची उत्सुकता सगळीकडे पाहायला मिळत आहे.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें