जगाला भारताने दिलेल्या योग या अनमोल देणगीचा जागतिक उत्सव म्हणजे आंतरराष्ट्रीय योग दिन. योग दिनाचे औचित्य साधत ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड पुणे आणि भारतीय जैन संघटना विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळच्या शुद्ध वातावरणात योगासने, ध्यानधारणा, प्राणायम साधनेद्वारे मनोबल व चैतन्य यांचा सुरेख संगम विद्यालयात साधला गेला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी केलेल्या अतिशय तालबद्ध आणि लयबद्ध सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
याप्रसंगी ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड पुणे चे डायरेक्टर एस. डी. राणे, स्टॅंडर्ड प्रोमोशन ऑफिसर हर्ष मोहन शुक्ला, राजू ससाने, ज्ञानप्रकाश सर, मनोजकुमार सिन्हा, अक्षय कुठे, राजश्री गुगले आणि राहुल सुरवसे तसेच विद्यालयाचे प्राचार्य संतोष भंडारी, पर्यवेक्षक पांडुरंग पवार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. श्रावणी मोरे आणि कु.श्रेया सोनवणे यांनी केले. तसेच योगासनाचे धडे विद्यार्थ्यांनी प्रशिक्षित योग शिक्षिका सौं. राणी तोरडमल यांच्या मार्गदर्शनाखाली एक पृथ्वी एक स्वास्थ्यासाठी योग या पूरक दृष्टिकोनाच्या जागतिक मूलभूत कल्पनेतून गिरवले.सदर कार्यक्रमाचे नियोजन बी आय एस क्लब प्रमुख स्मिता शिंदे तसेच रेश्मा शितोळे, प्रांजली ठुबे यांनी केले.
याप्रसंगी विद्यालयातील कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचा समन्वय पाहण्यासारखा होता .